घरलाईफस्टाईलरोजच्या वापरातील महत्त्वाच्या टीप्स

रोजच्या वापरातील महत्त्वाच्या टीप्स

Subscribe

स्वयंपाकासाठी काही खास टिप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो. तो जाऊ नये, याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ पण घालावे म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही.
  • कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढई, तसराळे किंवा मोठा बाऊल यात मळली तर मळायला सोपी जाते.
  • कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात किंवा तूपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळायचे असतात. नाहीतर तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून उतवरून तेल थोडे गार होऊ द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे म्हणजे मग करपणार नाही.
  • नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी. म्हणजे त्यावर माश्या-चिलटे बसत नाहीत. नकळत पदार्थामध्ये धूळ, किडामूंगी वगैरे पडत नाही.
  • नेहमीच्या तूरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते. त्यायोगे पालकही खाल्ला जातो.
  • घरी थोडे वरण शिल्लक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी काही भाजी नसेल तर अशावेळी जर घरी पालक असेल तर तूरीच्या डाळीची नेहमीप्रमाणे आमटी करावी. भरपूर पालक चिरून घालावा आणि चांगला शिजू द्या. ही पालकाची झटपट पातळ भाजी तयार होते.
  • कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्यात डाळीचं पिठ १-२ चमचे घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टफ करून कोबीचे स्टफ्ड पराठे बनवा.
  • कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास, पनीरचे क्यूब्ज करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्ज १०-१५ मिनिटे ठेवा. मग एका चाळणीत ५ मिनिटे पनीर निथळत ठेवा. आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डीशमध्ये वापरण्यासाठी तयार.
  • कोणताही पुलाव किंवा जिरा राइस, स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा, तांदूळाच्या दीडपट पाणी घालावे आणि २ शिट्ट्या कराव्यात. भात मोकळा आणि फडफडीत होतो.
  • गरमागरम इडली, इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात.
  • काही भाज्या, उसळी आणि भात करताना तयार मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो. अशावेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात. त्याऐवजी १ चमचाभर तेलात थोडा मसाला घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाहीत आणि मसाल्याचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -