घरक्रीडाबेन स्टोक्स ठरला विस्डेनचा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू!

बेन स्टोक्स ठरला विस्डेनचा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू!

Subscribe

क्रिकेटचे बायबल म्हणून ओळखल्या जाणार्‍या ’विस्डेन’ने इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सची जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. मागील सलग तीन वर्षे हा मान भारताचा कर्णधार आणि सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या विराट कोहलीने मिळवला होता. मात्र, मागील वर्षी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या स्टोक्सने आता विराटला मागे टाकले. २००५ साली अँड्र्यू फ्लिंटॉफ विस्डेनचा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला होता आणि त्यानंतर हा मान मिळवणारा स्टोक्स इंग्लंडचा पहिलाच खेळाडू आहे.

२८ वर्षीय स्टोक्ससाठी मागील वर्ष अविस्मरणीय ठरले. इंग्लंडने पहिल्यांदा विश्वचषक पटकावण्याची किमया साधली आणि त्यांच्या या विजयात स्टोक्सने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेच्या हेडिंग्ले येथे झालेल्या तिसर्‍या कसोटीत त्याने नाबाद १३५ धावांची मॅचविनिंग खेळी केली.

- Advertisement -

इंग्लंडसमोर हा कसोटी सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात ३५९ धावांचे आव्हान होते. त्यांची ९ बाद २८६ अशी अवस्था होती. मात्र, स्टोक्सने जॅक लिचला हाताशी घेत अखेरच्या विकेटसाठी ७६ धावांची अभेद्य भागी रचत इंग्लंडला विजय मिळवून दिला. “स्टोक्सने काही आठवड्यांतच दोन अविस्मरणीय खेळी केल्या होत्या. लाल चेंडू असो किंवा पांढरा, तो उत्कृष्ट खेळाडू आहे”, असे विस्डेनचे संपादक लॉरेंस बूथ म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -