उन्हाळ्यात तुमच्या मोती सोन्या आणि ब्रुनोची अशी घ्या काळजी

या रखरखत्या उन्हामुळे मानुष्याप्रमाणाने कुत्र्यांना देखील Heat Strokeचा त्रास होतो. Heat Strok पासून कुत्र्याची कशी काळजी घ्यावी.

उन्हाचा (Summer)  तडाका वाढत आहे. या उन्हाच्या जसा त्रास माणसाला होतो. तसा, त्रास कुत्रा (dog) देखील होतो. या रखरखत्या उन्हामुळे मानुष्याप्रमाणाने कुत्र्यांना देखील Heat Strokeचा त्रास होतो. Heat Strok पासून कुत्र्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल आपण आज माहिती घेऊ या…

Dehydrationपासून वाचण्यासाठी कराव्यात ‘या’ गोष्टी

उन्हाळ्यात Dehydrationचा त्रास होणे ही सर्वसामान्यांना समस्या आहे. परंतु, तुमच्या कुत्र्यांना Dehydrationचा त्रास होऊ नये, म्हणून कुत्र्याजवळ पाणी ठेवावे. जेणे करून त्यांना Dehydrationचा त्रास होणार नाही.

सकाळी आणि सायंकाळी फिरायला घेऊन जावे

तुम्हाला तुमच्या कुत्र्याला सकाळी आणि संध्याकाळी फिरायाला घेऊन जावे. पण, तुम्ही चुकूनही दुपारच्या वेळेत तुमच्या कुत्र्याला फिरायला घेऊन जाऊ नका. कारण दुपारच्या वेळी उष्णता जास्त असल्यामुळे कुत्र्यांना Heat Stroke होऊ शकतो.

कुत्र्यांसाठी ‘या’ गोष्टी कराव्या

  • तुम्ही तुमच्या कुत्र्यांना वेळोवेळी ग्लूकोज (Glucose) द्यावे. यासोबत यात इलेक्ट्रॉल सुद्धा मिक्स करून देऊ शकता.
  • तुम्ही तुमच्या घरात कुत्र्याला थंड जागी ठेवा किंवा तुमच्या प्राण्यासाठी तुम्ही कूलर सुद्धा लावू शकता.
  • उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या कुत्र्यांना दररोज अंघोळ घालू शकता. परंतु, अंघोळ घालताना शॅपूचा वापर करू नका.
  • तुम्हाला तुमच्या कुत्र्याच्या Diet वर लक्ष द्यावे. तुम्ही दररोज त्यांच्या diet plan बनवा. त्यानुसार, त्यांना जेवण द्यावे.
  • कुत्र्याला खाण्याला खरबूज, काकडी, ओली ग्रेव्ही आदी गोष्टी द्याव्या.
  • कुत्र्यांना उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी द्यावे. याव्यतिरिक्त तुम्ही दही आणि ताक देखील तुमच्या प्राण्याच्या diet plan सामावेश करावा.

 

हेही वाचा – Relationship: मुलांना परिक्षेत कमी मार्क्स मिळाले तर कसं handle कराल?