घरलाईफस्टाईलबहुगुणी बाजरी

बहुगुणी बाजरी

Subscribe

हिवाळ्यात अतिमहत्त्वाची

आपल्या राज्यात अजूनही बहुतांश ठिकाणी बाजरी आवडीने खाल्ली जाते. बाजरीची भाकरी, खीर, खिचडी असे पदार्थ बनवले जातात. हिवाळ्यात ही बाजरी अतिमहत्त्वाची ठरते. थंडीमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी बाजरीची भाकरी खाल्ली जाते. तर हिवाळ्यात सतत भूक लागत असल्याने भाकरीमुळे पोटभर आहार घेतला जातो. बहुउपयोगी बाजरीचे आणखीही काही पैलू आहेत. ते जाणून घेऊ या.

बाजरी हे आशिया आणि आफ्रिका खंडातील गरिबांचे महत्त्वाचे पूरक अन्न. भाकरी, रोटी, रोटली अशा नावांनी चवीने खाल्ली जाणारी बाजरीची भाकरी संक्रांतीला तीळ लावून अधिक चविष्ट बनविली जाते. आफ्रिकेत आणि आपल्या आंध्र प्रदेशात बाजरीचे दाणे उखळात कांडून, तिची साल काढून मग दळतात. त्या पिठाचे आंबवून धिरडे करतात. दक्षिणेत बाजरी शिजवून भात तयार करतात. खीर आणि खिचडी हे बाजरीचे आणखी दोन प्रकार.

- Advertisement -

बाजरा, कुम्बू (तमीळ), रवाज्जे (कन्नड), सज्जालू (तेलगू) अशा अनेक नावांनी बाजरी ओळखली जाते. अमेरिकेत तिला ‘कॅटटेल’ किंवा ‘र्बगडी मिलेट’ या नावांनी ओळखतात. अमेरिका, कॅनडा, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व युरोपातसुद्धा बाजरीची लागवड होते. बाजरीतील प्रथिनांमुळे अन्नाचा पोषक गुणधर्म वाढतो.

बाजरीची भाकरी आणि खिचडी सर्रास बनवली जाते. आज आपण बाजरीची खीर बनवण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
                                                                                                                                     साहित्य :                                                                                                                        दीड वाटी बाजरी, १ लिटर दूध, २ वाट्या साखर, वेलदोड्याची पूड, १० बदामाचे काप.

- Advertisement -

कृती :                                                                                                                            आदल्या दिवशी रात्री बाजरी पाण्यात भिजत घालावी. सकाळी पाण्यातून काढावी व कपड्यावर पसरून सुकवावी. सालपटे टाकून द्यावी. दूध गरम करावे. त्यात बाजरी घालावी व ढवळत राहावे. बाजरी शिजली की त्यात साखर घालावी. ढवळत राहावे. दाट झाले की उतरवावे. पसरट भांड्यात काढावे. वरून वेलदोड्याची पूड व बदामाचे काप घालावे. फ्रीजमध्ये ठेवून खीर थंडगार करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -