घरलाईफस्टाईलबहुगुणी बर्फ

बहुगुणी बर्फ

Subscribe

रोज ३ ते ४ मिनिटे बर्फाने चेहर्‍याचा मसाज करा. याने रक्ताभिसरण सुधारेल आणि त्वचेचा ग्लो वाढेल.

* रोज २-३ बर्फाचे तुकडे खाल्ल्याने वजन कमी होईल.

- Advertisement -

* जळलेल्या त्वचेवर लगेच बर्फाचे तुकडे ठेवावे. जळजळ कमी होते आणि व्रण पडत नाही.

* रात्री झोपण्यापूर्वी बर्फाने चेहर्‍याचा मसाज केल्याने पिंपल्स दूर होतात.

- Advertisement -

* अधिक वेळेपर्यंत कॉम्प्युटरवर काम केल्यानंतर डोळ्यांवर आईस क्यूब ठेवावे. गारवा आणि आराम मिळेल.

* बॅक पेन किंवा संधिवात असलेली जागा बर्फाने शेकावी. वेदनांपासून मुक्ती मिळते.

* इंजेक्शन लावल्यानंतर वेदना आणि सूज कमी करण्यासाठी त्या जागेवर बर्फ घासावा.

* लहान-सहान जखमेवर आईस क्यूब ठेवल्याने रक्ताचा प्रवाह थांबेल आणि वेदना कमी होतील.

* पायात लचक आल्यास कपड्यात बर्फ गुंडाळून त्या जागेवर ठेवावे. सूज आणि वेदना कमी होईल.

* झोपण्यापूर्वी बर्फाने चेहर्‍यावर मसाज केल्याने स्किन टाइट होईल आणि निरोगी राहील.

* मसल्स ताणलेल्या असल्यास कपड्यात आईस क्यूब गुंडाळून त्या जागेवर ठेवावे. आराम मिळेल.

* दात दुखत असल्यास किंवा हिरड्यावर आणि गालावर बर्फाचा तुकडा ठेवल्याने दातांना गारवा मिळतो.

* फास टोचल्यास त्या जागेवर आईस क्यूब ठेवून ती जागा सुन्न करावी, ज्याने फास काढताना वेदना होत नाहीत.

* रोज रात्री डोळ्यांच्या जवळपास आईस क्यूबने मसाज केल्यास डार्क सर्कल्स आणि टॅनिंगची समस्या दूर होईल.

* डोकेदुखीत थोडा वेळ आईस क्यूबची पोटली बांधावी आणि डोक्यावर ठेवावी. आराम मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -