घरलाईफस्टाईलकेस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहात, मग हे वाचा!

केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहात, मग हे वाचा!

Subscribe

कोरफड अनेक समस्यांवर आयुर्वेदिक औषध म्हणून ओळखले जाते. कोरफड केसांसाठी बर्‍यापैकी फायदेशीर ठरू शकते. कोरफडीचा वापर केसांच्या वाढीसाठी आणि त्वचाला ग्लो येण्यासाठी करतात. केस गळतीच्या समस्येमुळे अक स्त्रीया त्रस्त असतात. अशावेळी अनेकजण वैद्यकीय सल्ला घेतात. पण केसांच्या वाढीसाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. यामुळे तुमचे केस लवकर आणि दाट वाढण्यात मदत होईल. केस वाढण्यासाठी केसांना जास्तीत जास्त मालिश करण्याची गरज असते. अशावेळी कोणते तेल वापरावे याबबात मनात शंका असते. अशावेळी केसांना नॅचरल ऑईलचा वापर करा. त्यामुळे तुमचे केस गळणंही कमी होईल.

कोरफडीमध्ये अनेक आयुर्वेदीक गुणधर्म आहेत. यामुळे तुमच्या केसांच्या समस्या दूर होतील. केसांचे उत्तम पोषण करण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या तेलाचा उपयोग करू शकता. कोरफडीबरोबरच जोजोबा ऑईल, ऑलिव ऑईल, या तेलांमध्ये नारळाचे तेल मिक्स करून तुम्ही त्याचा वापर केसांसाठी करू शकता. तुमच्या केसांना आमि त्यांच्या मुळांना हलक्या हाताने या तेलाचा वापर करायचा आहे.

- Advertisement -
Aloe vera gel
कोरफड

कोरफडीच्या तेलाचे फायदे

१. कोंड्यापासून मिळेल मुक्तता

कोरफडीच्या तेलाचा केसांवर केलेल्या वापरामुळे केसातील कोंडा जाण्यास मदत होईल आणि तुमचे केस सिल्की होण्यास मदत होईल. कोरफडीमुळे केसातील कोंडा गायब होईल त्यामुळे केसात येणारी खाजही बंद होईल.

२. केसांच्या वाढीसाठी फायदेशीर

– ज्यांचे केस वाढत नाहीत अशांनी आठवड्यातून किमान दोन वेळा कोरफडीच्या तेलांनी हलका मसाज केसांना करावा. या तेलाच्या वापरामुळे ब्लड सर्कुलेशन सुरळीत होण्यास मदत होईल. जर तुम्ही दररोज कोरफडीच्या तेलाने मसाज केला तर तो अधिक फायदेशीर ठरेल.

- Advertisement -

३. केस गळती थांबेल

केसांच्या बबातीत मोठी समस्या म्हणजे केसांचे गळणे. ९० टक्के तक्रारी या केस गळतीच्या असतात. यासाठी रामबाण उपाय म्हणजे कोरफडीचे तेल. कोरफडीमध्ये व्हिटामीन ए, सी आणि ई असते. या व्हिटॅमिनमुळे केस मजबुत व्हायला मदत होते. त्यामुळे केस मजबूत होतात आणि तुटत नाहीत. त्यामुळे केसगळतीही थांबते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -