घरताज्या घडामोडीरोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्यासाठी गुळवेलाचा अतिवापर ठरु शकतो जीवघेणा

रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्यासाठी गुळवेलाचा अतिवापर ठरु शकतो जीवघेणा

Subscribe

आयुर्वेदात गुळवेलाचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. गुळवेलाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका कमी होतो. तर गुळवेळाचे अति सेवन आपल्या शरिरासाठी धोकादायक ठरु शकते.

देशभरात कोरोना (Corona)  आणि ओमिक्रॉन (Omicron ) व्हेरिएंटने तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिले आहे. कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टापेक्षा कमी खतरनाक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र तरीही कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक जण अनेक घरगुती उपाय करतात. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. अनेक वेळा गुळवेलाचा काढा तयार केला जातो. गुळवेल आपल्या शरिरासाठी फायदेशीर असली तरी त्याचा अति वापर हा आपल्याला महागात पडू शकतो. काय आहेत गुळवेलाचे फायदे आणि तोटे जाणून घेऊया.

आयुर्वेदात गुळवेलाचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. गुळवेलाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका कमी होतो. तर गुळवेळाचे अति सेवन आपल्या शरिरासाठी धोकादायक ठरु शकते. अमेरिकन एसोसिएशन फॉर स्टडी ऑफ लीवर डिजीजने याबाबत एक अभ्यास केला.

- Advertisement -

या अभ्यासात किंग जॉर्ज मेडिकल यूनिव्हर्सिटीच्या 13 मेडिकल सेंटर्समध्ये लिव्हर रिसर्च क्लब ऑफ इंडियाद्वारे अभ्यास  करण्यात आला. या अभ्यासात 43 रुग्णांचा समावेश होता ज्यात 23 महिला आणि 20 पुरुषांचा समावेश होता. या सर्व रुग्णांना कावीळची लागण झाली होती. त्यांची तपासणी केली असता त्यांना क्रॉनिक लिव्हर डिसीस म्हणजेच लिव्हर फेलची समस्या होती. हे सर्व रुग्ण अनेक दिवसांपासून गुळवेलाचे सेवन करत होते.

केजीएमयूमध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजीचे असोसिएट प्रोफेसर डॉ. अजय कुमार पटवा यांनी म्हटले की, 67.4 रुग्णांचे लिव्हर फेल होण्याचे मुख्य कारण हे गुळवेलाचे सेवन करणे होते. या रुग्णांना डायबिटीज, थायरॉइड, हाय ब्लड प्रेशर सारख्या समस्या होत्या. यातील काही रुग्णांना दारुचे व्यसनही होते. अनेक रुग्ण हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनेक वर्षांपासून गुळवेलाचे सेवन करत होते. ज्यामुळे त्यांच्या शरिरातील एंटीन्यूक्लियर एंटीबॉजी उत्पन्न होणे कमी झाले आणि लिव्हरला धक्का बसला.

- Advertisement -

गुळवेल निश्चितपणे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. मात्र याचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या मनाने कधीही गुळवेलाचे सेवन करू नये. गुळवेलासोबतच इतर कोणत्याही पदार्थाचा वापर शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करू नये. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.


हेही वाचा – फ्रिजमध्ये अंडी ठेवावीत की ठेवू नयेत? काय सांगतात तज्ज्ञ

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -