सलमान मध्यरात्री कॉल करतो; ‘या’ अभिनेत्रीने केली दबंगस्टारची पोलखोल

मोठ्या पडद्याबद्दल बोलायचे झाल्यास लारा शेवटची बेल बॉटम या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील इंदिरा गांधींच्या लूकमधली तिच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली होती.

Lara Dutta reveals Salman Khan wakes up only post 12 am, calls her at midnight
सलमान मध्यरात्री कॉल करतो; 'या' अभिनेत्रीने केली दबंगस्टारची पोलखोल

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता आणि अभिनेता सलमान खान एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. ‘पार्टनर’ या चित्रपटातील दोघांच्या केमिस्ट्रीने त्याकाळी प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप निर्माण केली. आजही जेव्हा दोघांच्या मैत्रीची चर्चा होते तेव्हा ‘पार्टनर’मधील त्यांची बाँडिंग आठवते. मात्र ते दोघे किती चांगले मित्र आहेत याचा खुलासा खुद्द लारा दत्ताने नुकत्याच एका मुलाखतीत केला आहे.

या मुलाखतीत लाराने सांगितले की, सलमान रात्री 12 वाजल्यानंतर उठतो. तो अजूनही मला मध्यरात्रीनंतर फोन करतो. सलमान त्याच वेळी उठतो आणि त्याच वेळी मला त्याचा कॉल येतो. मी त्याचे कॉल्स रिसीव करते. मध्यरात्री फोन करणे आणि समोरच्याने कॉल उचलणे, यावरून तुम्ही समजलाच असाल हीच लारा आणि सलमानची मैत्री किती घट्ट आहे. जसे चांगले मित्र एकमेकांना फोन करण्यासाठी वेळेची फिकीर करत नाहीत, त्याचप्रमाणे सलमान आणि लारा यांच्यामध्येही वेळेचे बंधन नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lara Dutta Bhupathi (@larabhupathi)

‘पार्टनर’, ‘नो एंट्री’ याशिवाय सलमान आणि लाराने आणखी काही हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेय. ऑनस्क्रीन दोघांनी चांगली बाँडिंग दाखवली आहे, पण ऑफ स्क्रीनही सलमान आणि लाराची मैत्री निखळ आणि सुंदर आहे.

‘बेल बॉटम’मधील इंदिरा गांधींच्या लूकचे झाले कौतुक

लारा दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास नुकतेच तिने ‘हिकप्स अँड हूकप्स’ या सीरिजद्वारे OTT वर पदार्पण केले. या सीरिजमध्ये त्याच्याशिवाय प्रतीक बब्बर आणि शिनोवा यांनी देखील काम केलेय. मात्र लारा आणि प्रतीक यांच्या अभिनयाचे सर्वाधिक कौतुक झाले. मोठ्या पडद्याबद्दल बोलायचे झाल्यास लारा शेवटची ‘बेल बॉटम’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील इंदिरा गांधींच्या लूकमधली तिच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली होती.


Gond Ke Laddu: ‘गोंद के लड्डू’ साध्या मानवी भावनांची कथा आहे – नीना कुळकर्णी