घरलाईफस्टाईलतुम्हाला सायनस आहे? तर अशी घ्या काळजी

तुम्हाला सायनस आहे? तर अशी घ्या काळजी

Subscribe

सायनस हा एक सर्दीचा प्रकार असून सायनसवर परिणाम झाल्याने हा आजार होतो. तसेच सायनस या आजाराची लक्षणे आणि त्यासंबंधी काळजी कशी घ्यायची हे जाणून घ्या.

सायनस म्हणजेच नाकाच्या दोन्ही बाजूला तसेच डोळ्याच्या खोबणीच्या वर कवटीच्या हाडामध्ये असलेल्या पोकळ जागांना सायनस असे म्हणतात. सायनस हा एक सर्दीचा प्रकार असून सायनसवर परिणाम झाल्याने हा आजार होतो. सायनस या आजाराचे चार प्रकार आहेत. मॅक्झिलरी, इथेमॉइड, फ्रंटल आणि स्फिनॉड असे हे चार प्रकार आहेत. हे चारही सायनस नाकाला जोडलेले असतात. सायनसच्या या पोकळ्यामध्ये फक्त निरोगी हवा असते. या पोकळ्या नाकाच्या अंतर्भागाला छोट्या छिद्राद्वारे जोडलेल्या असतात. नाकाच्या दोन्ही बाजूंना चार-चार अशा एकूण आठ पोकळ्या असतात. मध्यकर्णातून निघणारी नळीही नाकात उघडते म्हणूनच सर्दीमध्ये सायनसदुखी किंवा कानदुखी असे आजार बळवतात.

या आजाराची प्रमुख लक्षणे

  • नाक आणि सायनसमध्ये अॅलर्जी असणे.
  • वाढते प्रदूषण, धूम्रपान, अस्वच्छ पाण्यात पोहणे.
  • जेव्हा व्यक्तीला सर्दी किंवा अॅलर्जी होते, तेव्हा नाकतून पाण्यासारखे द्रव अतिप्रमाणात बाहेर पडत असणे.
  • सायनसला आतून सूज येणे, नाक वाहणे, कपाळ दुखणे, डोके दुखणे असे होते.
  • सामान्य सर्दी, सतत नाक बंद राहणे किंवा नाकातील हाड वाढल्यामुळे सायनसचा त्रास होतो.
  • नाकाच्या भोवती, डोळ्यांवर आणि जबड्याच्या हाडांमध्ये तीव्र वेदना होतात.
  • वेदना सकाळी जास्त जाणवतात. तसंच, डोक्याच्या हालचालीनं किंवा डोक्याला धक्का बसल्यानं वाढतात.
  • चेहरा सुजल्यासारखा दिसतो.

या संबंधी काळजी कशी घ्यावी

  • नाकाला श्वसनाला त्रास होईल किंवा संक्रमण होईल असे खाद्यपदार्थ, डिओ स्प्रे, एअर फ्रेशनर्स आणि इतर गडद सुंगंधी वस्तूंपासून शक्यता तितके दूर राहणे योग्य.
  • सकाळी किंवा दिवसभरात कधीही १५ मिनिटे स्वतःला व्यायामासाठी वेळ काढा, खोल श्वासोच्छवासाचा व्यायाम करा, नाक आणि सायनसद्वारे हवाई प्रवाह वाढवा.
  • ओल्या केसांनी पंखाखाली किंवा एअर कंडिशनरच्या समोर बसणे टाळा.
  • तसेच स्वसनाचा त्रास होत असेल, तर गर पाणाच्या वाफ घ्या.
  • तसेच धुम्रपान आणि मद्यपानाचे सेवन करणे टाळा.
  • सर्दी होईल अशा पोषण वातावरणात राहणे टाळा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -