घरलाईफस्टाईलवाचाल तर वाचाल

वाचाल तर वाचाल

Subscribe

बालवयापासून घरातील मंडळी तसेच शिक्षकांकडून सतत वाचन करा म्हणून लागलेला तगादा आपल्याला कंटाळवाणा वाटतो. मात्र, नियमित वाचन हा एकप्रकारे बुद्धीचा व्यायामच असल्याचे आपण विसरतो. नियमित वाचनाने केवळ ज्ञान समृद्ध न होता, मनोरंजन, संयम, नोकरीच्या संधी यासारखे फायदे आपल्याला अनुभवता येतात. जाणून घेऊयात नियमित वाचनाचे फायदे…

* नियमित वाचन केल्याने आपल्या ज्ञानात भर पडेल. वाचनाची आवड जोपासल्याने मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्यप्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो. वाचनामुळे मेंदुला चालना मिळते नवनवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहिती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते.

- Advertisement -

* विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध झाली आहेत. फावल्या वेळात मनोरंजनाव्यतिरिक्त या साधनांचा आपण वापर करत नाही. तेच जर एखादे ऑनलाईन साहित्य वाचले तर आपला वेळ सत्कारणी लागतो. आपला फावला वेळ वाया न जाता, एखाद्या विषयावर लेखकाची मते जाणून घेत स्वतःची मते तयार होण्यास मदत होते. वाचनामुळे आपण लेखकाने लिहिलेल्या ठिकाणी जाऊन आल्याचा आनंद मिळतो. आपण त्यातील प्रत्येक पात्र जगत असतो.

* वाचताना आपण लेखकाचे म्हणणे ऐकत असतो. सध्याच्या जीवनात ऐकण्यासाठी कोणाला वेळ नसतो. वाचनामुळे आपल्याला इतरांचे ऐकायची सवय लागते. ऐकण्यासाठी संयम असायला हवा. वाचनामुळे आपण आपोआप संयम राखायला शिकतो.

- Advertisement -

* अनेक नोकरीच्या संधी वाचनामुळे निर्माण होतात. अनेक ठिकाणी वाचनीय ज्ञान चांगले असते त्याला उत्तम प्रकारच्या नोकरीच्या संधी असतात. उत्तम वाचन असेल तर काम करताना ईमेल लवकर समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे कामाची गती वाढते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -