घरलाईफस्टाईलतळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरणं प्रकृतीसाठी अपायकारक

तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरणं प्रकृतीसाठी अपायकारक

Subscribe

एकदा वापरलेलं तेल पुन्हा गरम केल्यास त्यामधून विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.

स्वंयपाक घरातून येणाऱ्या खमंग अशा भजी,बटाटे वडे, पूरी , पापड यांच्या सुवासानेच तोंडाला पाणी सुटते. तसेच हे पदार्थ खाण्यासाठी देखील तितकेच चविष्ट व रुचकर लागतात. अनेक महिलांना आपल्या कुटुंबाला असे चमचमीत पदार्थ करुन देण्याची भारी हौस असते. पण अनेकदा हे पदार्थ तयार करतांना जास्त प्रमाणात तेलाचा वापर करावा लागतो व पदार्थ तळून झाल्यानंतर तेल कढईमध्ये उरते यावर उपाय म्हणून अनेक महिला हे उरलेलं तेल (reuse oil) इतर भाज्यामध्ये वापरतात. पण असे करणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तेलाचा पुन्हा वापर केल्याने गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो. तज्ञानी दिलेल्या माहितीनूसार, एकदा वापरलेलं तेल पुन्हा गरम केल्यास त्यामधून विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. आणि या तेलाचे इतर कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये वापर केल्यास शरीरात फ्री रेडिकल्स वाढू लागतात. यामुळे शरिरावर सूजन येणे तसेत अनेक प्रकारच्या आजारांना सामना करावा लागू शकतो. FSSAI (भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) यांनी दिलेल्या गाइडलाइलंस नुसार, एकदा वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे अपायकारक ठरु शकते. (reuse of cooked oil can be harmful)

  • जास्त तापमानावर तापवण्यात आलेल्या तेलामधून विषारी धूर निघतो यामुळे तेलाला कमी तापमाणात म्हणजेच स्मोक पॉइंट पर्यंतच तापवावे.
  • प्रत्येक वेळी तेल गरम करताना तेलातून फॅट पार्टिकल्स तूटायला सुरूवात होते. यामुळे तेल स्मोक पॉईंटची सिमा गाठू लागतो. तसेच याचा वारंवार उपयोग केल्याने यातून वास येण्यास सुरूवात होते. जेव्हा असे घडते तेव्हा आजार पसरवणारे पदार्थ हवेमध्ये आणि जेवणात आपसूकच मिसळले जातात.
  •  या तेलामुळे जेवणात आढळणारा दमटपणा, वायुमंडळ ऑक्सीजन, उच्च तापमान, हाइड्रोलिसिस, ऑक्सीकरण , पोलीमराइजेशन सारख्या प्रतिक्रीया निर्माण करतात. आणि या क्रियांचा उपयोग , फॅटी अॅसिड , रेडिकल जो मोनोग्लिसराइड्स, डाइग्लिसराइड्स , ट्राइग्लिसराइड्स उत्पन्न करतात. हे त्यांच्या रासायनिक संरचनेमध्ये बदल घडवून आणतात आणि संशोधित करतात.

हे हि वाचा-कांदा आणि लसणाच्या सालींचे फायदे जाणून घ्या…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -