घरलाईफस्टाईलअशी घ्या किडनीची काळजी

अशी घ्या किडनीची काळजी

Subscribe

आज जागतिक मूत्रपिंड दिवस, म्हणजेच वर्ल्ड किडनी डे. किडनी हा मानवी शरीरातील एक महत्वपूर्ण अवयव आहे. किडनी शरीरातील अनावश्यक द्रव्य आणि इतर पदार्थांना मुत्राच्या रुपात बाजूला करून रक्ताचे शुद्धीकरण करते. तसेच शरीरात क्षार आणि आम्लाचे संतुलन ठेवते, रक्तातले त्यांचे योग्य प्रमाणही कायम राखते. अशा रीतीने किडनी शरीराला स्वच्छ् आणि निरोगी ठेवते. त्यामुळे किडनीच्या आरोग्याची काजळी घेणे महत्वाचे आहे.

* पौष्टिक आहार घ्या – योग्य प्रमाणात व चांगल्या दर्जाच्या प्रथिनांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. खाद्यपदार्थांच्या लेबलवर सोडीयम, पोटॅशियम व फॉस्फरसचे दिलेले प्रमाण पाहूनच ते पदार्थ खरेदी करा. तसेच आहारात प्रथिने समाविष्ट करण्यापुर्वी तुमच्या आहारतज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्या.

- Advertisement -

* आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्या – किडनी विकार असलेल्या लोकांना उच्च रक्तदाब, ह्रदयविकार व मधुमेह असण्याची शक्यता अधिक असते. यासाठी प्रथम आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्या जे तुम्हाला तुमच्या आरोग्य स्थितीनुसार तुमचा आहार नियोजित करण्यासाठी मदत करतील.

* लिचींग प्रक्रियेने तयार केलेल्या भाज्या निवडा – किडनी विकाराच्या रुग्णांसाठी भाज्यांमधील सोडीयम, पोटॅशियम व फॉस्फरस हे घटक कमी करण्यासाठी त्या लिचींग प्रक्रियेने शिजवणे गरजेचे असते. यासाठी कोमट पाण्यात कापलेल्या भाज्या २-३ तास बूडवून ठेवा. त्यानंतर ते पाणी काढून टाका व त्या भाज्या स्वयंपाकासाठी वापरा.

- Advertisement -

* योग्य प्रमाणात पाणी प्या – किडनीवरील ताण कमी करण्यासाठी व शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी प्रत्येकाने दिवसभरात ३ ते ४ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. तुम्ही जितके अधिक पाणी पिता तितकी अधिक लघवी तुमच्या शरीरात निर्माण होते. सहाजिकच त्या लघवी सोबत शरीरातील विषद्रव्ये देखील बाहेर टाकली जातात. त्यामुळे तुमच्या किडनीवरचा भार कमी होतो व किडनी समस्या होण्याचा धोका देखील कमी होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -