घरलाईफस्टाईलसफरचंद सकाळी खाल्याने होतात 'हे' फायदे; जाणून घ्या

सफरचंद सकाळी खाल्याने होतात ‘हे’ फायदे; जाणून घ्या

Subscribe

सफरचंदात (apple) लोह, प्रथिने, जीवनसत्त्वे असल्याने सकाळी रिकाम्या पोटी खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. सफरचंदात कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) आढळते. सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्याने शरीराला दिवसभर एनर्जी (Energy) मिळते. यामुळे दिवसही आनंदी जातो. सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्याने आरोग्याला खूप फायदा होतो. यासाठी चला जाणून घेऊ या.

1. रोगप्रतिकारक शक्ती वाढते

- Advertisement -

सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्याने तुमची प्रतीकारक शक्ती वाढते. सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C), प्रथिने (protein) आणि इतर घटक असल्यामुळे रोगप्रतीकारशक्ती वाढायला मदत होते. सकाळी सफरचंद खाल्याने इतर रोगांशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतीकारकशक्ती मजबूत होते.

2. पोषक तत्वे

- Advertisement -

सफरचंदात फायबर (Fiber), अँटिऑक्सिडंट्स (antioxidants) आणि जीवनसत्त्वे ( vitamins) असल्याने सफरचंद सकाळी खाल्याने त्यामधील असलेले सर्व पोषक तत्व शोषून घेण्यासाठी मदत होते. सफरचंदात पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी देखील असते.

3. वजन

सफरचंद रोज सकाळी खाल्याने तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेऊ शकता. कारण सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने आपल्याला जास्त भूक लागत नाही. यामुळे आपले जास्त खाणे टाळता येत आणि वजन (Weight) कमी होण्यासाठी मदत होते.

4.ह्रदय

सफरचंद सकाळी रिकाम्या पोटी खाल्याने ह्रदय निरोगी राहते. कारण सफरचंदमध्ये फायबर असल्याने नियंत्रित राहते. यामुळे ह्रदयविकाराचा धोकाही टळतो. सफरचंदामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-सीही असते.

5. शरीरातील सूज दूर होते

सफरचंद सालीसहीत खाल्याने शरीरातील सूज दूर होण्यासाठी मदत होते. सफरचंदाच्या सालीमध्ये फ्लेव्होनॉइड केर्सेटिन असल्याने शरीरात होणारी जळजळही थांबते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -