कोरोनाच्या काळात शरीरासह मनालाही असते ‘पौष्टिक आहारा’ची गरज

these 5 diets should be eaten for mental health in the corona period
कोरोनाच्या काळात शरीरासह मनालाही असते 'पौष्टिक आहारा'ची गरज

कोरोनाच्या काळात बऱ्याच व्यक्ती या आपल्या आहाराकडे लक्ष देतात. आजारी असताना सातत्याने पौष्टिक आहार खाण्याचा डॉक्टरांकडून देखील सल्ला दिला जातो. मात्र, आजारी असताना बऱ्याचदा आपण केवळ शरीर उत्तम राहावे, याकडे लक्ष देतो. परंतु, त्यावेळी आपले मानसिक स्वास्थ देखील चांगले राहणे फार गरजेचे असते. कारण एखादी व्यक्ती टेन्शनमध्ये असते त्यावेळी त्या व्यक्तीला अतिप्रमाणात गोड खाण्याची इच्छा होते. तर बऱ्याच जणांना चटपटीत म्हणजे पिझ्झा, पेस्ट्री आणि आईस्क्रिम खाण्याची इच्छा होते. परंतु, हे खाणे शरीरासाठी घातक असल्याने या व्यतिरिक्त आपण कोणते पदार्थ खाऊ शकतो? जे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतील पाहुयात.

मटण, मासे

मासे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण माशांमध्ये ओमेगा – ३ फॅटी Acidचा समावेश असतो. यामुळे मानसिक स्वास्थ उत्तम राहते. तसेच माशांना ब्रेन फूड म्हणून देखील म्हटले जाते.

fry fish

बेरी

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी ही उत्तम फळ आहेत. याचा तुम्ही नाश्तामध्ये देखील समावेश करु शकता. यामध्ये anti oxidationअसते. त्यामुळे एखादे इंफेक्शन कमी करण्यासाठी याचा अधिक फायदा होतो. तसेच मानसिक स्वास्थ उत्तम राहण्यासाठी या फळांची मदत होते.

दही

दह्याचा आहारात समावेश करावा. दह्यामुळे पोटाचे आजार होत नाहीत. विशेष म्हणजे दह्याचे सेवन केल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.

Curd

अक्रोड

अक्रोड हे एक उत्तम ड्रायफ्रूट आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात anti oxidationचा समावेश असतो. त्यामुळे बऱ्याचदा स्नॅक्स खाण्याची इच्छा झाल्यावर अक्रोडचे सेवन करावे. यामुळे मानसिक स्वास्थ ही उत्तम राहते आणि पोटही भरते.

हिरव्या भाज्या

हिरव्या पाले भाज्यांमधे सर्व महत्वाचे पोषक घटक असल्यानं शरिराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शिअम, बीट कॅरोटीन आणि क जीवनसत्वाचा समृध्द स्रोतदेखील आहे.

Vegetable


हेही वाचा – चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी अन्यथा आरोग्यास होईल हानी