घरलाईफस्टाईलआल्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे…

आल्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे…

Subscribe

आल्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

रोजच्या डाएटमध्ये आल्याचा समावेश केल्यास फायद्याचे ठरते. आल्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे अनेक समस्यांपासून सुटका मिळते. सतत सर्दी, खोकला किंवा सूज येण्याची समस्या असेल तर आल्याचे पाणी प्यायल्याने फायद्याचे ठरू शकते. उपाशी पोटी आल्याचे पाणी प्यायल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते. तसेच आल्याच्या पाण्याचे आरोग्यास होणारे बरेच फायदे आहेत.

चनक्रिया उत्तम राहते

पचनक्रिया सुधारण्यासाठी आल्याचं पाणी दररोज पिणे फायदेशीर ठरु शकते. यासाठी आले रात्रभर पाण्यात ठेवा. सकाळी हे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. उलटी येणे किंवा मळमळ होणे अशा समस्याही हे पाणी प्यायल्याने दूर होतात. त्यासोबतच हे पाणी प्यायल्याने तुम्हाला सकाळी फ्रेशही वाटते.

- Advertisement -

वजन कमी करण्यास मदत

आल्याचं पाणी तुम्हाला वजन कमी करण्यास फायदेशीर ठरु शकते. इतकेच नाही तर याने तुमची ब्लड शुगरही नियंत्रित राहण्यास मदत होते. डायबिटीजचा धोकाही कमी होतो. आल्याचं पाणी प्यायल्याने भूक कमी लागते त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.

त्वचा आणि केस चांगले राखण्यास

आल्याच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अॅटीऑक्सिडेंट तत्व असतात. त्यामुळे आल्याचे पाण्याचे सेवन केल्याने शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मिळतात. यामुळे केसाची आणि त्वचेची सुंदरता वाढण्यास अधिक मदत होते.

- Advertisement -

मांसपेशींना आराम

एक्सरसाईज केल्यानंतर अनेकांना मसल्समध्ये वेदना होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. आल्याचं पाणी प्यायल्याने मसल्सना आराम मिळते आणि वेदना दूर होतात.

इम्युन सिस्टिम मजबूत होते

आल्याचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम तर चांगले होतेच शिवाय इम्युन सिस्टिमही मजबूत होते. आल्यातील कॉपर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे व्हिटामिन एस, सी आणि ई मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -