घरलाईफस्टाईलRelationship Tips : नात्यात असावा गोडवा आणि सकारात्मकता!

Relationship Tips : नात्यात असावा गोडवा आणि सकारात्मकता!

Subscribe

कोणत्याही नात्यामध्ये गोडवा असला की ते नाते दिर्घायुषी झालेच म्हणून समजा. सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक नात्यातील तो गोडवा…, तो ओलावा कुठेतरी मागे पडत चालला आहे. मग ते नातं आई-वडिल आणि मुलांचं असो, नवरा – बायकोचं, प्रियकर – प्रेयसीचं वा मैत्रीचं असो. या नात्यांची जपवणूक ही आपल्याच हातात असते. नाते टिकवण्यासाठी त्यामध्ये गोडवा आणि सकारात्मकता या दोन्हीची सांगड असणे गरजेचे आहे. नात्यांमध्ये मतभेद, रुसवे-फुगवे असावेत. पण तिरस्कार, कटुता आणि हेवेदावे नसावे. तरच ते नातं चितंरत काळासाठी टिकते. आपल्या नात्यातील हाच गोडवा आणि ओलावा वाढवण्यासाठी या काही गोष्टी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात.

हेही वाचा – Long Distance Relationship मध्ये नातं टिकावायचंय… तर ‘या’ गोष्टी करा Follow

- Advertisement -
  • पारदर्शकता – नात्यामध्ये पारदर्शकता ठेवा. कोणतीही गोष्ट आपल्या पार्टनरपासून लपवू नका. प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट सांगितली तरी विश्वास कायम टिकतो. मात्र महत्त्वाच्या गोष्टी त्यांना तिसऱ्या व्यक्तीकडून समजली तर नात्याला तडा जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पारदर्शकता हा प्रत्येक नात्याचा कणा आहे. 

हेही वाचा – तुमचा जोडीदार सोशल मीडियावर जास्त रमतोय, वेळीच सावध व्हा…!

- Advertisement -
  • विश्वास – आपल्या पार्टनरवर डोळे झाकून विश्वास ठेवता यायला हवा. कोणत्याही गोष्टीची शहानिशहा करण्यापूर्वी संवाद साधून, चर्चेतून निष्कर्ष काढण्याचा मार्ग नेहमीच सुखकर ठरतो. यामुळे तुम्ही आपल्या पार्टनरचा विश्वास संपादक करू शकता. एकदा का हा विश्वास बसला की ते नातं अजून घट्ट होत जातं. मात्र याच विश्वासाला तडा गेली तर ते पुन्ही जुळून येईल, याची शाश्वती नाही. 

  • सकारात्मकता – कितीही कठिण प्रसंगी असला तरीही दोघांनीही सकारात्मक भावना ठेवल्यास आयुष्यातील अडचणींवर एकत्र मात करता येते. प्रामुख्याने प्रेमीयुगुलांमधील नातेसंबंधाविषयी बोलायचे झाले तर कुटुंबियांचा होकार, दोघांमध्ये कोणी तिसरा तर येत नाही ना ही भीती यांसारख्या अडचणी येत असत. त्यावर केवळ सकारात्मक भावनाच तुमच्या नात्याला बळकटी देऊ शकते. सकारात्मक विचार केल्यास घटनाही मनासारख्याच होतात. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -