घरलाईफस्टाईलWorld Hepatitis Day 2021: शिळे अन्न खाल्ल्याने होऊ शकते लिव्हर खराब!

World Hepatitis Day 2021: शिळे अन्न खाल्ल्याने होऊ शकते लिव्हर खराब!

Subscribe

जागतिक किर्तीचे संशोधक डॉ. बरूच ब्लूमबर्ग यांनी ‘हेपेटायटीस ई’ या विषाणूचा शोध लावला. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज, २८ जुलै रोजी हा दिवस जागतिक हेपेटायटीस दिवस साजरा केला जातो. हेपेटायटीस हा एक आजार असा आहे जो मानवी यकृताला हानी पोहोचवितो. यकृत शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून त्याचे शरीर डिटॉक्सिफाय करण्याचे काम करते. हेपेटायटीस ५ प्रकारचे असते – हेपेटायटीस -बी, सी आणि हेपेटायटीस -ए, डी, ई. हेपेटायटीस -बी, सी, डी शरीराच्या संक्रमित द्रवपदार्थाच्या संपर्कातून पसरतो. तर हेपेटायटीस -ए, ई दूषित तसेच शिळे अन्न खाण्यापिण्यामुळे होत असतो.

डॉक्टरांच्या मते, हेपेटायटीस हा प्राणघातक आजार एखाद्या व्यक्तीला कमी वेळात मारू शकतो. तसेच तो आपल्या यकृतस कायमचे नुकसान देखील पोहोचवू शकतो. म्हणून, हेपेटायटीस संक्रमित रुग्णांना खाण्यापिण्याची खूप काळजी घेणं आवश्यक असते. खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी यकृताच्या नुकसान कारणीभूत ठरू शकतात. हेपेटायटीस च्या रूग्णांनी काय खावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या जाणून घ्या…

- Advertisement -
  • हेपेटायटीस असणाऱ्या रूग्णांनी संपूर्ण आहार घेणं आवश्यक असते. हेपेटायटीसच्या रूग्णांसाठी सर्वात आरोग्यासाठी उपयुक्त म्हणजे संपूर्ण आहार. तुम्ही ओट्स, राई आणि कॉर्न सारख्या पदार्थही खाऊ शकता.
  • यकृताचे रोग नियंत्रित ठेवण्यासाठी, तुमच्या आहारात फळ आणि भाज्यांचा नियमित वापर करा. पोषक तत्वांनी युक्त असलेल्या भाज्या आणि फळे आवर्जून खावीत. त्यात बरेच अँटीऑक्सिडेंट देखील आढळतात जे तुमच्या यकृत पेशी खराब होण्यापासून बचाव करतात.
  • हेपेटायटीसच्या रूग्णांनी स्टार्च जास्त प्रमाणात असतील अशा भाज्या आणि फळांचे सेवन करावे. आपण हेपेटायटीस रिकव्हरी डाएटमध्ये बटाटे समाविष्ट करू शकता. याशिवाय फक्त ताजे व सिझनल फळे व भाजीपालाच खाण्यावर भर द्या.
  • हेपेटायटीसच्या रुग्णांनी त्यांच्या आहारामध्ये प्रथिनांची विशेष काळजी घेतली पाहिजे. हे लोक कमी चरबीयुक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या रूपात प्रथिने घेऊ शकतात. याशिवाय चिकन, शेंगा भाज्या, अंडी आणि सोयाबीन सारख्या प्रथिनयुक्त पदार्थ देखील खाऊ शकतात.

     

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -