घरलाईफस्टाईलबाल दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या यावर्षीची थीम

बाल दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या यावर्षीची थीम

Subscribe

बाल दिन प्तत्येक वर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त बाल दिन हा दिवस साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलं अतिशय प्रिय होती. लहान मुलं त्यांना ‘चाचा नेहरु’ म्हणायचे. त्यामुळे हा दिवस त्यांची आठवण म्हणून साजरा करण्यात येतो.

14 नोव्हेंबर 1956 पासून सुरु झाला बाल दिन
पंडित जवाहरलाल नेहरु यांचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बाल दिनाची सुरुवात करण्यात आली. सोबतच बालकांना त्यांच्या अधिकार आणि शिक्षणाप्रती जागरुक करणे हा देखील उद्देश त्यामागे आहे. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांनी देशातील मुलांसाठी उत्तम शिक्षण संस्थांची स्थापना केली. देशातील मुलांचे भवितव्य उजळण्यासाठी या संस्थांचा मोलाचा वाटा आहे. तसेच त्यांनी देशात निःशुल्क शिक्षण, कुपोषणापासून वाचण्यासाठी लहान मुलांना शाळेत मोफत आहाराचा देखील त्यात समावेश केला.

- Advertisement -

बालकांचा अधिकार
वयोगट 6 ते 14 मधील सर्व लहान मुलांना निःशुल्क आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षणाचा अधिकार देण्यात आला. कोणत्याही रोजगारापासून सुरक्षित होण्याचा अधिकारही देण्यात आला. तसेच लहानपणीच्या पालनपोषणाचा आणि शिक्षणाचा अधिकार देण्यात आला.

यावर्षीची थीम
खरंतर, भारतामध्ये 1956 आधी यूनायटेड नेशनकडून घोषित करण्यात आलेला यूनिवर्सल बाल दिन 20 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत होता. परंतु देशाचे पहिले पंत प्रधान जवाहरलाल नेहरु यांचा सन्मान करत 1964 च्या संसदेमध्ये एक प्रस्ताव पास करत 14 नोव्हेंबर ही तारीख बाल दिन म्हणून घोषित करण्यात आली. यावर्षीच्या बाल दिनाची थीम इंक्ल्यूजन, फॉर एव्री चिल्ड्रन ही आहे.

- Advertisement -

 


महिलांनो सुपरवुमन बनू नका, आरोग्य जपा

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -