घरलाईफस्टाईलमहिलांच्या आरोग्याशी निगडित समस्या मिटविण्यासाठी

महिलांच्या आरोग्याशी निगडित समस्या मिटविण्यासाठी

Subscribe

विवाहानंतर महिलांना भावनिक आणि शारीरिक बदलांना सर्वात जास्त सामोरे जावे लागत असते. अनेकवेळा काही शारीरिक समस्या जाणूनबुजून टाळल्या जातात. पण, या समस्यांचे वेळीच निराकरण झाले नाही, तर त्या वाढून गंभीर होण्याची भीती असते. आज आम्ही तुम्हाला महिलांच्या काही समस्यांबद्दल माहिती देणार आहोत, तसेच त्यासंबंधी घरगुती उपायदेखील सांगणार आहोत.

* महिलांमध्ये रक्ताची कमतरता, अत्याधिक मासिक स्रावाची समस्या असल्यास सरसोचा साग (पंजाबी पदार्थ) , तूप सकाळ-संध्याकाळ खावे अथवा पेठ्याच्या रसामध्ये साखर टाकून अर्धा कप प्यावे.

- Advertisement -

* गर्भाशयाची कमजोरी, सारखे-सारखे गर्भस्राव होणे या समस्या उद्भवत असल्यास शिंगाड्याच्या पिठाचा हलवा बनवून त्याचे सेवन करावे किंवा सिंघाडेच्या पिठाची पोळी बनवून खावी.

* ज्या महिलांना मासिक पाळीसंबंधी कसलाही त्रास असल्यास अशा महिलांनी सकाळी १-२ मूठ काळ्या तिळाचे सेवन करावे. असे केल्याने मासिक पाळी संबंधी असलेला त्रास कमी होण्यास मदत होते आणि त्वचादेखील सुंदर बनते.

- Advertisement -

* ५० ग्रॅम गुलकंद आणि २० ग्रॅम बडीशोप चाऊन त्यावर एक ग्लास दूध नियमितपणे प्यायल्याने गर्भाशयाशी निगडित समस्या आणि वंधत्वाचा त्रास कमी होतो.

* ५ ग्रॅम त्रिफळाघृताचे सकाळ संध्याकाळ सेवन केल्याने गर्भाशयाची शुद्धी होते आणि स्त्री गर्भधारणा करण्यासाठी पूर्णपणे तयार होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -