घरमहाराष्ट्रलॉकॅन्टो अॅपवर मैत्री; ५० हजारांची मागितली खंडणी

लॉकॅन्टो अॅपवर मैत्री; ५० हजारांची मागितली खंडणी

Subscribe

लोकॅन्टो अॅप वरून महिलेशी मैत्री करणं ४० वर्षीय इसमाला चांगलंच महाग पडलं आहे. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.

ऑनलाईन मैत्री करणं एका इसमाला चांगलंच महागात पडलं आहे. लोकॅन्टो अॅप वरून महिलेशी मैत्री करणं ४० वर्षीय इसमाला चांगलंच महाग पडलं आहे. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. सुरींद्रा उर्फ डॉली नजीर शेख अस या महिलेचे नाव असून तिने फिर्यादी सोबत शारिरीक संबंध ठेवत ५० हजार रुपयांची खंडणी मागितली आहे. तडजोडीअंती १० हजार रुपये घेऊन प्रकरण मिटलं असलं तरी याप्रकरणी फिर्यादी विजय कुमार काटकर यांनी महिलेविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत महिलेला जेरबंद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि सुरींद्रा यांची मैत्री लोकॅन्टो अॅपद्वारे झाली. रविवारी विजयने २ हजार पाचशे रुपये देऊन सना नावाच्या महिलेबरोबर शरीर संबंध ठेवले. थोड्याच अंतराने आरोपी सुरींद्रा हिने विजय सोबत शारीरिक संबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यासाठी तिला फिर्यादी यांनी दीड हजार रुपये देण्याची कबुली दिली. परंतु महिलेने फिर्यादीच्या मोबाईलवर रात्री उशिरा व्हाट्स अॅप मॅसेज करून ५० हजार रुपयांची मागणी केली. शिवाय, पैसे न दिल्यास पत्नी आणि सासऱ्याला सांगेल अशी धमकी दिली. ज्या बँकेत फिर्यादी हे काम करतात तिथे जाऊन गोंधळ करेल असं देखील म्हणाली. अखेर दहा हजार रुपयांवर हे प्रकरण मिटवल गेलं. मात्र संबंधित महिलेवर खंडणीची तक्रार विजय यांनी दिली आहे. याप्रकरणी महिलेला सांगवी पोलिसांनी जेरबंद केले आहे. या महिलेने अनेक जणांना अशाच प्रकारे फसवले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -