घरमनोरंजनअमृता सुभाष बनली रणवीर सिंगची 'आई'

अमृता सुभाष बनली रणवीर सिंगची ‘आई’

Subscribe

‘गली बॉय’ सिनेमात झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्या एका रॅपरची गोष्ट पाहायला मिळणार आहे.

रणवीर सिंग आणि आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गली बॉय’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. चित्रपटाची दोन पोस्टर्स रिलीज झाली असून, आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे चित्रपटाच्या ट्रेलरची. दरम्यान, ‘गली बॉय’ चित्रपटात एक मराठी चेहरा झळकणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र, आता हा चेहरा कोण याचा उलगडा झाला आहे. मराठमोठी अभिनेत्री अमृता सुभाष ‘गली बॉय’ चित्रपटात झळकणार आहे. अमृता सुभाष या चित्रपटात रणवीर सिंगच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. आता बॉलीवूडचा आघाडीचा हिरो असलेल्या रणवीर सिंगच्या आईच्या भूमिकेत अमृता सुभाषला पाहणं, ही प्रेक्षकांसाठीही वेगळी बाब ठरणार आहे. अमृताने सोशल मीडिया पोस्टद्वारे या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्यास खूप मजा आली असे अमृताने पोस्टमध्ये म्हटले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अमृता पहिल्यांदाच रणवीर सिंगसोबत काम करत आहे. या चित्रपटातील तिची बहुतेक दृश्य ही रणवीर सोबत चित्रीत करण्यात आली आहेत.

- Advertisement -

‘गली बॉय’ सिनेमात झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्या एका रॅपरची गोष्ट पाहायला मिळणार आहे. २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटाचा पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘गली ब्वॉय’चे बरचेस चित्रीकरण हे धारावीमध्ये करण्यात आले आहे.‘गली बॉय’ हा चित्रपट येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. झोया अख्तर या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘दिल धडकने दो’ चित्रपटानंतर झोया अख्तर आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. तर आलिया आणि रणवीर यानिमित्तामे प्रथमच एकत्र काम करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -