घरमहाराष्ट्रकाय चाललेय महाराष्ट्रात? छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या!

काय चाललेय महाराष्ट्रात? छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या!

Subscribe

वैष्णवी लव्हारे या १० वीच्या विद्यार्थिनीने सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. गावातील दोन तरुण तिला सतत त्रास देत होते.

बीड जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सततच्या छेडछाडीला कंटाळून १० वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे ही घटना घडली आहे. वैष्णवी लव्हारे असं या विद्यार्थीनीचे नाव असून तिने घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात दोन तरुणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतेले आहे.

वैष्णवी लव्हारे या १० वीच्या विद्यार्थिनीने सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. गावातील दोन तरुण तिला सतत त्रास देत होते आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. वैष्णवी ज्या गावात राहते त्याच गावातील अमित माने (१९ वर्ष) आणि रोहन फड (१९ वर्ष) हे तिला त्रास देत होते. ती कुठे गेली की सतत तिच्यामागे बाईकवरुन येत पाठलाग करायचे. या दोघांच्या सततच्या या त्रासाला वैष्णवी कंटाळली होती.

- Advertisement -

अमित आणि रोहण दोघांनी फक्त वैष्णवीला त्रास दिला नाही. तर त्यांनी पुढचे पाऊल उचलत तिच्या वडिलांना धमक्या देऊ लागले तसंच त्यांना मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. या सर्व त्रासाला कंटाळून शेवटी तिने आत्महत्येचा मार्ग स्विकारत घरामध्येच गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी रात्री वैष्णवीने गळफास लावून आत्महत्या केली. वैष्णवीने गळफास लावल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबियांनी तिला ताबडतोब रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

दरम्यान, याप्रकरणी वैष्णवीच्या वडिलांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अमित माने आणि रोहन पड यांच्याविरोधात विनयभंग आणि पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना देखील ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास बर्दापूर पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -