घरमहाराष्ट्रउद्यापासून ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

उद्यापासून ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

Subscribe

खाते सोपविल्यानंतर प्रथमच आशिष शेलारांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण हिताचा निर्णय घेतला

उद्यापासून ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरूवात होणार आहे. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शालेय शिक्षण मंत्री अँड. आशिष शेलार यांनी एक महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये विज्ञान शाखेकरिता ५ टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी ८ टक्के जागा वाढल्या असून मुंबई, पुणे आणि नागपूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात जागा वाढवून देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

पावसाळी अधिवेशानामध्ये राज्य सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय विद्यार्थ्यांना दिलासा देणारा आहे. यावेळी विज्ञान शाखेसाठी ५ टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी ८ टक्के जागा वाढवल्या असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण, हिताचा निर्णय

रविवारी झालेल्या मंत्री मंडळ विस्तारामध्ये आशिष शेलार यांना स्थान देण्यात आल्याने पुर्वी असलेले विनोद तावडेंकडील शिक्षण खाते रविवारी आशिष शेलार यांच्याकडे सोपविण्यात आले. हे खाते सोपविल्यानंतर प्रथमच आशिष शेलारांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण तसेच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयांकडून नेहमीच ११ वीच्या प्रवेशाच्या वेळी जागा कमी किंवा मर्यादित असल्य़ाची तक्रार असायची मात्र यावर उपाययोजना म्हणून आशिष शेलार यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -