घरमहाराष्ट्रनिर्दयी काकाने केला पुतणीवर बलात्कार

निर्दयी काकाने केला पुतणीवर बलात्कार

Subscribe

घरात आजोबांच्या मृत्यूचा वाईट प्रसंग घडला होता.

बलात्काराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चंद्रपूरमध्ये काकाने स्वत:च्या पुतणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात आजोबांच्या मृत्यूचा वाईट प्रसंग घडला होता. घरात पाहुणे मंडळी असतानाही काकने आपल्या पुतणीवर बलात्कार केला. चंद्रपूर येथील गोंडपिंपरी तालुक्यातील येनबोथला गावात ही घडली आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.

येनबोथला गावात पीडित मुलीच्या आजोबांचे निधन झाले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास घरातील मंडळी जेवण करण्याकरिता बसले असताना हा संपूर्ण प्रकार घडला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्यावर घरातील मंडळींना झालेला प्रकार समजला.आजोबांच्या मृत्यूमुळे घरातील मंडळी तणावात होती. त्यातच मुलीसोबत झालेल्या प्रकारातने पीडित मुलीच्या घरच्यांना मोठा धक्का बसला.

- Advertisement -

नेमकं काय घडलं ?
शुक्रवारी चंद्रपूरच्या येनबोथला गावात पीडित मुलीच्या आजोबांचे निधन झाले. आजोबांचे अत्यंविधी पार पाडून सगळे घरी परतले होते.रात्री साडेनऊच्या सुमारास घरातील मंडळी पाहुण्यांसह जेवायला बसले होते. पीडित मुलगी काही कामासाठी घराबाहेर पडली. हिच संधी साधून काकाने पुतणीला घराबाहेरच्या रांजीत नेऊन तिच्यावर लौगिंक अत्याचार केले. थोड्या वेळाने मुलीचे वडील घराबाहेर आले तेव्हा त्यांना मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज एकून वडील घाबरले आणि आवाजाच्या दिशेने गेले. वडील घटनास्थळी पोहचताच काकाने तिथून पळ काढला.

घरच्यांनी मुलीची विचारपूस केली. तेव्हा काकाने माझ्यावर बालात्कार केल्याचे मुलीने सांगितले. या आधी ही काकाने माझ्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. कोणाला काही सांगितलेस तर तुला जीवे मारिन अशी धमकीही दिली होती त्यामुळे मी कोणाला काही सांगितले नाही असं मुलीनी सांगितले.
मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात घरच्यांनी गोंडपिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर त्वरित पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी गावाजवळच्या पाण्याच्या टाकीजवळ लपून बसलेल्या आरोपी काकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

हेहि वाचा – अवैध गुटखा विक्रीवर पोलिसांचा छापा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -