घरIPL 2020IPL 2020 : ९० च्या स्ट्राईक रेटने सामने जिंकता येत नाहीत; नीशमचे...

IPL 2020 : ९० च्या स्ट्राईक रेटने सामने जिंकता येत नाहीत; नीशमचे आकाश चोप्राला प्रत्युत्तर

Subscribe

न्यूझीलंडचा ऑलराऊंडर आणि IPL 2020 मध्ये पंजाबकडून खेळणारा जेम्स नीशम (James Neesham) आणि समालोचक आकाश चोप्रा यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. आकाश चोप्राने नीशमच्या खेळावर टीका करताना त्याच्या निवडीवर प्रश्न निर्माण केला आहे. आकाश चोप्राच्या टीकेला जेम्स नीशमने उत्तर दिलं आहे. यावर नाराज झालेल्या आकाश चोप्राने त्याच्या शैलित उत्तर दिलं आहे.

जेम्स नीशमने RCB विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये २ ओव्हरमध्ये १३ धावा देऊन एकही विकेट घेतली नाही, तर राजस्थानविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने ४ षटकामध्ये ४० धावा देऊन १ विकेट घेतली. शिवाय, मुंबईविरुद्धच्या चौथ्या सामन्यामध्ये त्याला ४ षटकामध्ये ५२ धावा खर्च देऊन एकही विकेट मिळाली नाही. तर या ३ सामन्यामध्ये फलंदाजाला करताना नीशमला ७ धावाच केल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईविरुद्धच्या पराभवाची समीक्षा करताना आकाश चोप्रा म्हणाला, “परदेशी खेळाडू म्हणून नीशमला खेळवलं जात आहे, पण तो पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करु शकत नाही आणि शेवटच्या काही षटकामध्येही नाही. तो महान फिनिशरही नाही किंवा टॉप ४-५ मध्येही फलंदाजी करु शकत नाही. मग पंजाब त्याला का खेळवत आहे? मॅच विनर नसलेल्या खेळाडूला तुम्ही खेळवत आहात.” यावर नीशमने आकाश चोप्राला उत्तर दिलं आहे. “१८.५ ची सरासरी आणि ९० च्या स्ट्राईक रेटनेही जास्त मॅच जिंकता येत नाहीत,” असं नीशम म्हणाला. आकाश चोप्राने त्याच्या कारकिर्दीत २१ सामन्यांमध्ये १८.५५ च्या सरासरीने ९१.२५ च्या स्ट्राईक रेटने ३३४ धावाच केल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -