घरताज्या घडामोडीपरमबीर सिंह खंडणी प्रकरणात मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांना CIDकडून अटक

परमबीर सिंह खंडणी प्रकरणात मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांना CIDकडून अटक

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या खंडणी प्रकरणात मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र केंद्रीय गुप्तचर संस्था सीआयडीने कारवाई केल्याचे समोर आले आहे. नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे वांद्रे गुन्हे शाखा कक्ष ९ मध्ये होते.

ठाण्यातील बिल्डर अग्रवाल याने दिलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त अकबर पठाण सह पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरकेसह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यापैकी ठाण्यातील तीन गुन्हे आणि मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील एक गुन्हा असे एकूण ४ गुन्ह्यचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी)कडे सोपवण्यात आला होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या चारही गुन्ह्याचा तपास एकत्रितपणे सुरू केला असून या गुन्हयातील साक्षी पुराव्यावरून सोमवारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि महिला पोलीस निरीक्षक आशा कोरके या दोघांना अटक केल्याची  अधिकृत माहिती सीआयडी अधीक्षक मारुती जगताप यांनी दिली आहे.

- Advertisement -

अग्रवाल नावाचा एक व्यापारी आणि बिल्डरच्या तक्रारीवरुन मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह आणि इतर अनेक अधिकारी त्यांच्यावर दाखल केलेले खटले मागे घेण्यासाठी त्यांच्याकडून १५ कोटींची खंडणी मागितल्याचा त्यांनी आरोप केला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -