घरताज्या घडामोडीमुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी 2 लाख 44 हजार जागा रिक्त; पसंतीचे कॉलेज...

मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी 2 लाख 44 हजार जागा रिक्त; पसंतीचे कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थी नाराज

Subscribe

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या आतापर्यंत 2 प्रवेश फेऱ्या झाल्या आहेत. या दोन फेऱ्यांमध्ये एकूण 1 लाख 27 हजार 92 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मात्र पसंतीचे कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशास नकार दिला आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या आतापर्यंत 2 प्रवेश फेऱ्या झाल्या आहेत. या दोन फेऱ्यांमध्ये एकूण 1 लाख 27 हजार 92 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मात्र पसंतीचे कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशास नकार दिला आहे. यंदा मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी 3 लाख 71 हजार 275 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी आतापर्यंत केवळ 1 लाख 27 हजार 92 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, 2 लाख 44 हजार 183 जागा रिक्त राहिल्या आहेत. (2 lakh 44 thousand seats of Class XI are vacant of 11 th admissions students denied admission)

सोमवारी 22 ऑगस्टला ऑनलाइन प्रवेशातील नियमित फेऱ्यांमधील तिसरी आणि अखरेची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या यादीत प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना विशेष फेरीवर अवलंबून रहावे लागणार आहे.

- Advertisement -

मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त

या तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर कोटा प्रवेशातही विद्यार्थ्यांना संधी असून, या जागा रिक्त असल्याने प्रवेशासाठीदेखील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. दरम्यान, कोटा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 21 ऑगस्टला संपणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, प्रवेश प्रक्रियेवेळी कॉलेजमध्ये प्रवेशाच्या यादीच नाव येऊनही अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले नाही. त्यामुळे रिक्त जागांची संख्या जास्त असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आतापर्यंत कॉलेज अलॉट होऊनही प्रवेशासाठी संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 42 हजारांपर्यंत पोहोचली आहे.

रिक्त जागा

  • इनहाऊस कोट्यातील 10 हजार 991
  • अल्पसंख्याक कोट्यातील 75 हजार 542
  • व्यवस्थापन कोट्यातील 14 हजार 72

बोर्डनिहाय झालेले प्रवेश

बोर्ड                         अर्ज केले              प्रवेश मिळाला
एसएससी                  2,67,668              1,13,285
सीबीएसई                    9, 669                 4, 378
आयसीएसई                12,735                  7, 725
आयबी                        15                          1
आयजीसीएसई              1,631                     864
एनआयओएस               322                         84
इतर                         2084                      755


हेही वाचा – न्यायालयात व्हायचे ते होईल, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, जनता गद्दारांना धडा शिकवेल : उद्धव ठाकरे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -