घरताज्या घडामोडीवाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीला खिंडार, वंचितच्या १८ नगरसेवकांसह २३ जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...

वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीला खिंडार, वंचितच्या १८ नगरसेवकांसह २३ जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Subscribe

वाशिम जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला मोठं खिंडार पडले आहे. वंचितच्या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. वाशिम, मावळ आणि ठाणे ग्रामीण भागातील भारिप, भाजपच्या अनेक नेत्यांनी व नगरसेवकांनी गुरुवारी प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या १८ नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे वाशिम जिल्ह्यात वंचितला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केलं आहे. या नगरसेवकांचा राष्ट्रवादीला चांगला फायदा होणार आहे. तर वंचितला याचा गंभीर परिणाम भोगायला लागण्याची शक्यता आहे. जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आदरणीय पवारसाहेबांचे कुटुंब आहे. या‌‌ कुटुंबात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपले प्रश्न इथे नक्कीच‌ सुटतील. कार्यकर्त्यांची गुज राखणारा हा पक्ष आहे. काही दिवसांनी राष्ट्रवादीची सदस्य नोंदणी सुरु होणार आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून पक्षनोंदणीचा कार्यक्रम जोरात राबवा असे आवाहन केले.

- Advertisement -

राष्ट्रवादीला बळकट करण्यासाठी पक्षप्रवेश प्रभावी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना नवीन सदस्यांचे पक्षात स्वागत केले व पक्ष बळकटीसाठी सर्वांना एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शरद पवारांच्या स्वाभिमानातून स्थापन केलेल्या पक्षाची विचारधारा सामान्य जनतेपुढे पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आजचा पक्षप्रवेश प्रभावी ठरेल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव व नगरसेवक व ठाणे महानगरपालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, गुंदवळी उपसरपंच विलास पाटील, भिवंडी शिवसेना विभाग अध्यक्ष भालचंद्र भोईर, राहनाळ उपसरपंच किरण नाईक यांनी पक्षात प्रवेश केला.

- Advertisement -

मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने लोणावळ्याचे विद्यमान नगरसेवक भरत हरपुडे, आरोही तळेगावकर, तळेगाव माजी उपनगराध्यक्ष चंद्रभान खळदे, उपसरपंच स्वप्निल काळोखे, उद्योजक भरतशेठ काळोखे यांनीही हाती घड्याळ बांधले.

वाशिम जिल्ह्यातील नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या पुढाकाराने हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्यासह हेमेंद्र ठाकरे, जुम्मा पप्पुवाले, फिरोज शेकुवाले, चांदशा कासमशा, एजाज अ. मन्नान, जावेदोद्दीन शेख, इरफानखान इनायतुल्लाखान, जाकीर शेख मोहम्मद इसहाक, सलीम प्यारेवाले, राजू इंगोले, सलीम शेख लालू गारवे, अहमद रशीद कादीर, जाकीर अली अब्बासअली, आरीफ वारिस मौलाना, मुजाहीद  अजीज, निसारखान नजीरखान डॉ. धनंजय राठोड,  फैजल नागानी, संतोष भोयर, गोपाल खोडके,  सोहेल अंसारी,  बशीर रहीम, शेषराव राठोड या भारिपमधील २३ नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश झाला.


हेही वाचा : ‘काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी…’; अशोक चव्हाणांनी शेअर केला विलासराव देशमुखांचा तो व्हिडिओ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -