घरताज्या घडामोडीLive Update: परमबीर सिंह यांचे अखेर निलंबन

Live Update: परमबीर सिंह यांचे अखेर निलंबन

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे.


भारतात दोन ओमिक्रॉन रुग्ण आढळल्याची महत्त्वाची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहाय्यक सचिव लव्ह अग्रवाल यांनी दिली आहे. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकामधील असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -


महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या बैठक बोलावली.

- Advertisement -

१२ खासदारांच्या निलंबनासह विविध मुद्द्यांवरून तृणमूल काँग्रेसने राज्यसभेतून सभात्याग केला.


लोकसभेत कोरोनावर चर्चा झाली.


मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम विरार ते चर्चगेट जलद लोकलवर झाला आहे. त्यामुळे सर्व जलद लोकल धीम्या मार्गावर वळविल्या आहेत.


आज पुन्हा राज्यसभेत १२ खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून गोंधळ झाला. त्यामुळे आता राज्यसभा दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एच.एन. रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २२ दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून घरी परतत आहेत.


आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवास आहे. आज लोकसभेत कोरोना संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची आज सकाळी १० वाजता बैठक होणार आहे.


मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम पाऊस/ मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.


१०० कोटी वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निलंबनाची शक्यता वर्तवली जात आहे. कारण परमबीर सिंह यांच्या निलंबनासंदर्भातील फाईलवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे.


डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एका दिवसात पारा ९ अंशांनी घसरला आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यादरम्यान अमित शहा पुवांरकामधील शाकंभुरी देवी राजकीय महाविद्यालयचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थिती राहणार आहे. शिवाय उपमुख्यमंत्री दिनेश शर्मासुद्धा उपस्थितीत असणार आहेत. कार्यक्रम स्थळी सर्व मंत्री १ वाजता पोहोचणार आहेत.


उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला. मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झालाय. स्पेशल सिक्योरिटी युनिटच्या गाडीचे ब्रेक फेल होऊन ती उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -