घरमहाराष्ट्रराज्यात २,५४४ नवे रुग्ण, ६० जणांचा मृत्यू

राज्यात २,५४४ नवे रुग्ण, ६० जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४५,९७४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात २,५४४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,४७,२४२ झाली आहे. राज्यात ८४,९१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४५,९७४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १५, ठाणे ९, नाशिक ७, पुणे ७, परभणी ४ आणि चंद्रपूर ४ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे २२ मृत्यू हे नाशिक ७, पुणे ५,परभणी ४, चंद्रपूर २,ठाणे २, रायगड १ आणि सोलापूर १ असे आहेत.

- Advertisement -

आज ३,०६५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत १६,१५,३७९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४५ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -