घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये रात्री उशिरापर्यंत ५० हजार मूर्तींचे विसर्जन

पिंपरी-चिंचवडमध्ये रात्री उशिरापर्यंत ५० हजार मूर्तींचे विसर्जन

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये संस्कार प्रतिष्ठान हे मूर्तीदान आणि निर्माल्य जमा करण्याचे काम गेली काही वर्षे झाले करत आहे. या वर्षी देखील त्यांनी हा उपक्रम राबवला असून दुपारपर्यंत तब्बल २८ हजार मूर्तीदान झाले. रात्री उशिरापर्यंत ५० हजार मूर्तीदान करण्यात आले, असे संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड यांनी सांगितले आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे, असे ते म्हणाले.

Pimpri-Chinchwad
मूर्तींचे विसर्जन

गेली २४ वर्ष संस्कार प्रतिष्ठान मूर्तीदानाचा उपक्रम

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी संस्कर प्रतिष्ठान, डी.वाय.पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि काही संस्था मिळून मूर्तीदानाचा आणि निर्माल्य जमा करण्याचा उपक्रम राबवत आहेत. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत भरभरून प्रतिसाद मिळत असून दुपारपर्यंत २८ हजार मूर्तीदान झालेले असून रात्री १२ वाजेपर्यंत तब्बल ५० हजार मूर्तीदान होईल असे संस्कर प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड यांनी सांगितले होते. खर तर गणपती बाप्पांची मूर्ती ही पर्यावरण पूरक नसल्याने नदी प्रदूषन मोठ्या प्रमाणावर होते. हेच पाणी मानवी शरीरात गेल्यास अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. हेच रोखण्यासाठी गेली २४ वर्ष संस्कार प्रतिष्ठान मूर्तीदानाचा उपक्रम राबवत आहेत. गेल्या वर्षी ४३ हजार मूर्तीदान झाल्या होत्या. दरम्यान, मूर्तीदान केलेल्या मूर्ती या ट्रकमध्ये भरून पिंपरी-चिंचवड शहरातील विनोदी वस्ती येथील छोट्या तलावात ट्रकची विधिवत पूजा करून त्यामधील मूर्तीचे तलावात विसर्जन केले जाते.

- Advertisement -

हेही वाचा –

भास्कर जाधव यांनी दिला आमदारकीचा राजीनामा; आज बांधणार शिवबंधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -