घरमहाराष्ट्रभास्कर जाधव यांनी दिला आमदारकीचा राजीनामा; आज बांधणार शिवबंधन

भास्कर जाधव यांनी दिला आमदारकीचा राजीनामा; आज बांधणार शिवबंधन

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला. भास्कर जाधव हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. भास्कर जाधव हे आज, शुक्रवारी सकाळीच औरंगाबाद येथे पोहोचले. तिथे त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिला. जाधव यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार अनिल परब यावेळी उपस्थित होते. भास्कर जाधव हे पूर्वी शिवसेनेतच होते. पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. मात्र, आपल्या कर्तृत्वाला राष्ट्रवादीमध्ये फारसा वाव मिळत नसल्याची त्यांची भावना होती. त्यातूनच त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार आज त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.

- Advertisement -

गुहागरचे आमदार भास्कर जाधव गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेनेच्या वाटेवर होते. काही दिवसांपूर्वी जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत त्यांची एक तास चर्चा झाली होती. त्यामुळे भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, त्यांचे अधिकृतपणे पक्षांतर झाले नव्हते. आता अखेर आज, १३ सप्टेंबरला पक्षांतर होणार असल्याचे निश्चित झाले. भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना भास्कर जाधव मंत्री देखील होऊन गेले आहेत. याशिवाय त्यांनी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदही भूषवले आहे. त्यामुळे भास्कर जाधव पक्षाला सोडून गेले तर राष्ट्रवादीचे मोठे नुकसान होईल. भास्कर जाधव २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्याअगोदर ते शिवसेनेत होते. मात्र, शिवसेनेकडून आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

चंद्राचे दुर्मिळ रूप बघता येणार; १३ सप्टेंबरला १३ वर्षांनी खास योग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -