घरमहाराष्ट्ररेल्वेचं दिवाळी गिफ्ट; मुंबई-मडगाव दरम्यान धावणार ३०० विशेष ट्रेन

रेल्वेचं दिवाळी गिफ्ट; मुंबई-मडगाव दरम्यान धावणार ३०० विशेष ट्रेन

Subscribe

कोकणातील नागरिकांना मिळणार दिलासा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर मुंबई- मडगाव उत्सव विशेष ट्रेन धावणार आहे. या विशेष म्हणजे सणासुदीत या गाडीच्या एकूण ३०० फेर्‍या असणार आहेत. त्यामुळे कोकणातील नागरिकांना या गाड्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनूसार 01112 उत्सव विशेष एक्स्प्रेस १ नोव्हेंबर ते १४ जानेवारी २०२१ पर्यंत एकूण ७५ रेल्वे गाड्या धावणार आहेत. ही गाडी मडगाव येथून दररोज सांयकाळी ६ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचणार आहे. तर 01111 उत्सव विशेष एक्स्प्रेस २ नोव्हेंबर २०२० ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत (७५ फेर्‍या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज रात्री ११ वाजून ०५ मिनिटांनी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी मडगावला पोहचणार आहे. या दोन्ही उत्सव विशेष एक्स्प्रेस गाडीला दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, पेडणे, थिवी आणि करमाळी येथे थांबे असणार आहेत.

- Advertisement -

मुंबई – मडगाव विशेष ट्रेन (१५० फे-या)

01114 उत्सव विशेष एक्सप्रेस २ नोव्हेंबर २०२० ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत (७५ फे-या) मडगाव येथून दररोज सकाळी ०९.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. 01113 उत्सव विशेष एक्सप्रेस दि. २ नोव्हेंबर २०२० ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत (७५ फे-या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सकाळी ०७.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ७ वाजता मडगावला पोहोचेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -