घरमहाराष्ट्रकल्याण-डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले; आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू

कल्याण-डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले; आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना म्युकरमायकोसिसचे रुग्ण देखील वाढत असून राज्यातील इतर शहरांपाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतही या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. कल्याण-डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत ४३ रुग्ण आढळले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, ११ जण या आजारावर उपचार घेत आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत म्यूकरमायकोसिचे रुग्ण वाढू लागले आहेत. दरम्यान, या आजारामुळे आतार्पयत ८ जणांचा मृत्यू आला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये म्युकरमायकोसिसचे ४३ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, या आजारातून १८ जण बरे झाले आहेत. तर ११ रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भातील माहिती आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सरवणकर यांनी दिली आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार मिळावेत असा प्रस्ताव महापालिकेच्यावतीने राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यात १४ हजार नवे रुग्ण

राज्यात गेल्या चोवीस तासात १४ हजार 1१२३ कोरोनाबधितांची नोंद झाली आहे. तर ४७७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर हा १.६७ टक्के एवढा झालाय. राज्यातील कोरोन रुग्णांची संख्या ५७,६१,०१५ वर गेली आहे. सध्या राज्यात २,३०,६८१ सक्रिय रुग्ण आहेत

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -