घरमहाराष्ट्रनागपूरचा सुल्तान संजय गांधी उद्यानात दाखल

नागपूरचा सुल्तान संजय गांधी उद्यानात दाखल

Subscribe

मुंबईच्या संजय गांधी उद्यानात बाजीवार नावाच्या वाघाचे निधन झाल्यानंतर एकही वाघ या उद्यानात नव्हता. सध्या उद्यानात तीन वाघिणी आहेत. वाघांची संख्या वाढावी या निमित्ताने नागपूर येथून ५ वर्षांच्या सुल्तान वाघाला संजय गांधी उद्यानात आणण्यात आले आहे.

नागपूर गोरीवाडा प्राणी संग्रहालयातून अंदाजे ५ वर्षे वयाच्या सुल्तान या नर वाघाचे २६ डिसेंबर रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी संग्रहालयात आगमन झाले. नागपूर ते मुंबई सुमारे ८०० किमीचा प्रवास २४ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत पूर्ण करुन उद्यानाते रेस्क्यू पथक सुल्तानसह राष्ट्रीय उद्यानात पोहोचले. या प्रवासात पथकाने सुल्तानला विरंगुळा देण्यासाठी सलग प्रवास न करता काही कालावधीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी थांबून प्रवास केला. प्रवासात या प्राण्याला खाद्यासाठी कोंबडीचे मांस देण्यात आले. तसेच प्रवासभर पाण्याची उपलब्धता करुन देण्यात आली. या सर्व प्रवासाकरता राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू वाहनाचा वापर करण्यात आला.

सुल्तान या वाघाला राष्ट्रीय उद्यान प्राणी संग्रहालयामधील तीन वाघिणींसोबत ( बिजली ९ वर्षे, मस्तानी ९ वर्षे, लक्ष्मी १० वर्षे) प्रजननाकरता आणण्यात आले आहे. हा बंदिस्त प्राण्याच्या प्रजननाचा उपक्रम सुलतान हा वाघ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयात स्थिरस्तावर झाल्यानंतर कालांतराने घेण्यात येईल. सुल्तान वाघाला नागपुरहुन आणण्याचा प्रवास राष्ट्रीय उद्यानाच्या बचाव पथकामार्फत आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सध्या सुल्तानला उद्यानातील व्याघ्रविहार येथे ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, सुल्तानला नागपूर येथे पिंजऱ्यात बंदिस्त करण्यापासून, नागपूर ते मुंबई प्रवास तसेच उद्यानातील बंदिस्त पिंजऱ्यात स्थलांतरीत करणे या कामास कोणत्याही प्रकारे बेशुद्ध करण्यात आलेले नाही. संपूर्ण प्रवासात प्राण्यास कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता आणि विशेष काळजी घेत बचाव पथकाने सुल्तान वाघास सुखरुप उद्यानात पोच केल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिक्षक सिंहविहार यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -