घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रझटपट श्रीमंती, मौजमजेसाठी ६६.५० लाखांची लूट; चोर भावंड आहेत संगीत कलावंत

झटपट श्रीमंती, मौजमजेसाठी ६६.५० लाखांची लूट; चोर भावंड आहेत संगीत कलावंत

Subscribe

नाशिक : झटपट श्रीमंतीसाठी व मौजमजेसाठी दोन सख्ख्या भावांनी नाशिकमधील वयोवृद्ध व्यापार्‍याचे अपहरण करत पिस्तुलाचा धाक दाखवून तब्बल ६६ लाख ५० हजार रुपयांचे हिसकावून पळ काढलेल्या पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी कारचालकासह सख्ख्या भावाच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्या ताब्यातून चोरीचे ५३ लाख रुपये, वोल्स वॅगन कार, ३० हजारांचा मोबाईल, ट्रॅव्हलिंग बॅग खरेदी जप्त केली. न्यायालयाने दोघांना ५ एप्रिपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कारचालक देविदास मोहन शिंदे (वय ३७, रा. सातपूर, नाशिक), देविदास मोहन शिंदे (२६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सातपूर येथून दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ५३ लाख रुपये, कार, मोबाईल, बॅग जप्त केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, आसिफ तांबोळी, शरद सोनवणे, नाझिमखान पठाण, योगीराज गायकवाड, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मुक्तार शेख यांनी केली.

- Advertisement -
अशी घडली होती घटना

 कन्हैयालाल तेजसदास मनवानी (वय ७२) हे हॅपी होम डेव्हलपर्समार्फत स्थावर मालमत्तांची खरेदी-विक्री करतात. व्यवहारातील पैसे ते घरी नेत असल्याची माहिती कारचालक देविदास शिंदे यास होती. मनवानी यांना कारचालक शिंदे १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास कार(एमएच १५ जीएन ९५६७)ने घरी घेऊन जात होता. त्यावेळी मनवानींकडे कापडी पिशवीत ६६ लाख ५० हजार रुपयांची रोकड होती. ही बाब कारचालक शिंदे यांना माहिती होती. त्याने आंबेडकर चौक, होलाराम कॉलनी आल्यानंतर कार अचानक थांबली. काही समजण्याच्या आत कारमध्ये एक तरुण बसला. कारचालकाने कार सुरु करून पाथर्डी फाट्याच्या दिशेने नेली. त्यावेळी पाठीमागे बसलेल्या संशयिताने पिस्तुलाचा धाक दाखवून मनवानी यांच्याकडील ६६ लाख ५० हजार रुपयांची रोकड हिसकावली. कार मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळीलगत जैन मंदिराजवळ आल्यानंतर चालकाने कार थांबवली व कन्हैयालाल मनवानी यांना कारमधून खाली उतरवून दिले. त्यानंतर दोघांनी कन्हैयालाल यांची कार व रोकड घेऊन पळ काढला. कारमधून खाली उतरल्यानंतर कन्हैयालाल मनवाणी यांनी कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यानंतर मनवानी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ही कार काही दिवसांनी पोलिसांनी तपासात सापडली. मात्र, रोकड व चालक मिळून आला नाही.

चोरटा निघाला संगीत कलावंत

चोरी करण्याच्या पाच दिवस आधी युवराज शिंदे कन्हैयालाल मनवानी यांच्याकडे चालक म्हणून नोकरीला लागला होता. शिंदे हा एका पायाने अपंग असून, तो संगीत कलाकार आहे. त्याचे सातपूरमध्ये संगीत ग्रुप आहे. संगीत क्षेत्रातील व्यक्ती चोरटा निघाल्याने पोलिसांनी सखोल तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. युवराज शिंदे यास इंडीयन आयडॉलमध्ये जायचे होते. त्यासाठी त्याने अर्ज भरला होता. त्यास इंडीयन आयडॉलमधील अनेकजण ओळखत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

- Advertisement -
असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात 

नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस आरोपींच्या मागावर असताना दोघांना चोरीच्या ६६ लाख ५० हजार रुपयांमधून दुसर्‍याच्या नावावर महागडी कार खरेदी करणार असल्याचे समजले. त्यांना कोल्हापूरमध्ये कार खरेदी करता येत नव्हती. ओळखीचा व्यक्ती नाशिकमध्ये असल्याने दोघे नाशिकला आले. मात्र, ओळखीचा व्यक्ती पोलिसांच्या संपर्कात असल्याचे त्यांना माहिती नव्हते. ते नाशिकमध्ये येताच पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली.

लुटीसाठी पिस्तूल नव्हे नळीचा वापर

कारचालक युवराज शिंदे व देविदास शिंदे या दोघांनी कन्हैयालाल मनवानी यांच्याकडील 66 लाख ५० हजार रुपये लुटण्यासाठी प्लॅनिंग केले होते. त्यासाठी मनवानींना पिस्तुलाचा धाक दाखवण्याचे ठरविले. दोघांकडे पिस्तूल नसल्याने त्यांनी पिस्तूलसारखे दिसणार्‍या नळीचा वापर केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -