घरताज्या घडामोडीराज्यात ७१४ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह; तर ५ जणांचा मृत्यू

राज्यात ७१४ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह; तर ५ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात ७१४ पोलिसांना कोरोनाचीबाधा झाली असून पाच जणांचा कोरोना विषाणूमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूने राज्यात आपला विळखा अधिक घट्ट केला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. या सगळ्या धावपळीच्या जीवनात मात्र पोलिसांना देखील आता कोरोनाची बाधा होत आहे. राज्यात तब्बल ७१४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून पाच पोलिसांचा या विषाणूमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

६१ जणांवर उपचार सुरु

राज्यातील ७१४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यात ६४८ हे active केसेस असल्याचे समोर आले आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांपैकी ६१ जणांवर उपचार करून ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी देखील सोडण्यात आले आहे. तर पाच जणांना कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

६८९ आरोपींना अटक

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी भारतीयांनी घरी थांबून देशसेवा करण्याची गरज असतानाही काही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याच नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. या सगळ्या धावपळीच्या जीवनात मात्र, पोलीस प्रशासनाची पुरती धांदल उडाली आहे. तर अनेकांकडून अरेरावी होत असून पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार देखील घडत आहेत. दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ले होण्याच्या १९४ घटना समोर आल्या आहेत. त्यातील ६८९ प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

देशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९ हजार ६६२ झाली असून लवकरच ती ६० हजारांचा टप्पा पार करणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ९५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा १ हजार ९८१ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत १७ हजार ८४७ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.


हेही वाचा – …कुणाकुणाला उत्तर  देऊ?; पंकजा मुंडेनी ट्विटरवरून दिली प्रतिक्रिया 


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -