घरमहाराष्ट्र...कुणाकुणाला उत्तर  देऊ?; पंकजा मुंडेनी ट्विटरवरून दिली प्रतिक्रिया 

…कुणाकुणाला उत्तर  देऊ?; पंकजा मुंडेनी ट्विटरवरून दिली प्रतिक्रिया 

Subscribe

विधान परिषद निवडणुकीकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेल्या ज्येष्ठ दिग्गज नेत्यांची भाजपने निराशा केली असून त्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे यांचेदेखील नाव पुढे आले आहे. त्यावर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षाच्या या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही. उमेदवारी मिळालेल्या चौघांनाही माझे आशीर्वाद आहेत,’ असे सूचक ट्विट पंकजा यांनी केले आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे 

‘पक्षानं उमेदवार यादी जाहीर केल्यापासून दिवसभर फोन येते होते. कार्यकर्ते दु:ख व्यक्त करत होते. पण मी फोन उचलला नाही. कुणाकुणाला उत्तर देऊ. वाघांनो, असं रडू नका. मी आहे ना! तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही… साहेबांचे आशीर्वाद आहेत,’ असे कार्यकर्त्यांना धीर देताना त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

या चार नेत्यांना डावलंल 

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने गोपीचंद पडवळ, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत खडसे, तावडे तसेच बावनकुळे यांना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी नाकारली होती. राष्ट्रवादीतून विधानसभेच्या निवडणुकीत आयात करण्यात आलेल्या दोघांना तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जाणार्‍या दोघांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोनाचा सामुदायिक प्रसार होतोय का? ७५ जिल्ह्यांवर ICMR करणार अभ्यास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -