घरताज्या घडामोडीCoronaVirus: लालपरीचे ८६ कमांडो मुंबईकरांच्या सेवेत दाखल

CoronaVirus: लालपरीचे ८६ कमांडो मुंबईकरांच्या सेवेत दाखल

Subscribe

कुटुंबियांची पर्वा न करता मुंबईकरांच्या सेवेत एसटी कर्मचारी दाखल झाले आहेत.

कोणत्याही संकट काळात नेहमी धावून येणारी लालपरीने पुन्हा मुंबईकरांचा मदतीला धावून आली आहे. कोरोना या महामारीत सुद्धा पाच लालपूरीतून ८६ चालक आणि वाहक शेकडो किलोमीटर दुरुन एसटीचा सेवेत दाखल झाले आहे. स्वतःची आणि कुटूंबियांची पर्वा न करता कोरोनाविरोधात लढा देण्यास ठाणे, पालघर आणि मुंबईत हे एसटीचे कमांडो दाखल झाले आहे.

यासाठी एसटीचे चालक आणि वाहकांना बोलविण्यात आले

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे डॉक्टर्स, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, अग्निशमनदलाचे कर्मचारी, अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीचा भार एसटी महामंडळावर देण्यात आला आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर विभागामार्फेत शासनाच्या आदेशानुसार विशेष वाहतूक करण्यात येत आहे. मात्र लॉकडाऊनमुळे या तिन्ही विभागाचे कर्मचारी गावाला निघून गेले होते. त्यामुळे एसटी महामंडळाने चालक आणि वाहकांची कमतरता भासू नयेत, यासाठी सोलापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक विभागाचे एसटीचे चालक आणि वाहकांना बोलविण्यात आले आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. तसेच कोरोनाचा भीतीमुळे गाव बंदी करण्यात आली आहे. अशा भीतीमध्ये सुद्धा लालपरीचे कर्मचारी आपली सेवा देण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. रायगड विभाग २०, सातारा विभाग  १६, रत्नागिरी विभाग ६, सोलापूर विभाग २३ आणि नाशिक विभाग २१, असे एकूण ८७ एसटीचे वाहक आणि चालक मुंबईत दाखल झाले आहे.

- Advertisement -

लालपरीचे कर्मचारी शेकडो किलोमीटर दुरुन मुंबईत

वसई विरार, कल्याण डोंबिवली, पनवेल , वाशी , मुंबई अशा महापालिकाची शहरी वाहतूक करण्याची जबादारी आहे. तशी कायदा सुद्धा तरतूद करण्यात आला आहे. मात्र आलेल्या कोरोना संकटात सुद्धा त्यांची बसेस कमी पडत आहे. आता तर बेस्ट प्रशासनाने फतवा काढला आहे की, पाच दिवसांपेक्षा बेस्ट कर्मचारी गैरहजर असल्यास निलंबित करण्यात येणार आहे. शहरी वाहतुकीला आधार देण्यासाठी एसटीने पुढाकार घेतला आहे. त्यांचे कर्मचारी शहरात राहून सुद्धा कर्तव्यावर जात नाही. मात्र अशा परिस्थितीत कर्तव्यार्थ दाखवलेल्या लालपरीचे कर्मचारी शेकडो किलोमीटर दुरुन मुंबईत येत आहे. या ८७ कर्मचाऱ्यांचे कौतुक एसटी महामंडळात होत आहे.

अधिकारी वर्गाने कसली कंबर 

अधिकारी वर्गाने सुद्धा कंबर कसली असून या बाहेरून आणलेल्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नयेत, यासाठी एसटी अधिकारी वर्ग सुद्धा जोमात कामाला लागले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी एसटीचा फेऱ्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी बैठक घेतली. त्यांनी दिलेल्ल्या सूचनेप्रमाणे राहुल तोरो, महाव्यवस्थापक (वाहतूक) संजय सूपेकर, उपमहाव्यवस्थापक (वाहतूक) शैलेश चव्हाण, उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रं. १ या वाहतूक खात्यातील अधिकारी सुद्धा जोमाने कामाला लागले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अत्यावश्यक सेवेतील गैरहजर राहणाऱ्या कामागारांना निलंबित करण्याचा इशारा


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -