Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र फडणवीसांना निवेदन देताना 90 वर्षीय वृद्धाला भोवळ, वृद्धाची काय आहे मागणी

फडणवीसांना निवेदन देताना 90 वर्षीय वृद्धाला भोवळ, वृद्धाची काय आहे मागणी

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज फडणवीस यांनी सोलापुरातील महसूल भवनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याला भोवळ आल्याची घटना घडली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज (ता. 25 मे) फडणवीस यांनी सोलापुरातील महसूल भवनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याला भोवळ आल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ मदत करत त्यांच्याशी बातचीत केली. विलास शहा असे या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. (90-year-old man felt dizzy while giving a statement to Devendra Fadnavis)

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापुरातील महसूल विभागाचे उद्घाटन पार पडले. यानंतर त्यांना निवेदन देण्यासाठी आलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास शहा यांना फडणवीस यांच्याशी बोलताना अचानक भोवळ आली. सोलापुरातील नजीकचा कत्तलखाना बंद करण्यात यावा, याबाबतचे निवेदन देताना शहा चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विलास शहा यांना सावरत पाणी पाजले. ज्यानंतर शहा यांच्या तब्येतीची विचारपूस करून फडणवीस यांनी निवेदन स्विकारले. विलास शहा हे 90 वर्षाचे असून ते जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आजपर्यंत त्यांनी जिल्ह्यातील अनेक समस्यांवर आवाज उठवला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – ‘ना नेता, ना नीती’; विरोधकांनी राष्ट्रपती-राज्यपालांना डावलत केलेल्या उद्घाटनांची फडणवीसांनी वाचली यादी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -