घरताज्या घडामोडीपिंपरी-चिंचवडमध्ये वाढतोय कोरोनाचा धोका; बाधितांनी ओलांडला ५० हजारांचा टप्पा

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतोय कोरोनाचा धोका; बाधितांनी ओलांडला ५० हजारांचा टप्पा

Subscribe

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९८५ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होतोना दिसत आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला असून, एकूण बाधित रुग्णांची संख्या ५० हजार २९६ वर पोहचली आहे. तर यापैकी, पिंपरी-चिंचवड शहरातील ३५ हजार ४१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आत्तापर्यंत शहरातील ८६७ आणि महानगर पालिकेच्या हद्दीबाहेर मात्र पालिका प्रशासनाच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १९१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दिवसभरात आढळले ९८५ करोनाबाधित रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९८५ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ६३० जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या Active रुग्णांची संख्या ५ हजार ५८२ एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisement -

३५ हजारपेक्षा अधिक जणांनी केली कोरोनावर मात

एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. आतापर्यंत ३५ हजारांपेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून शहरातील व्यवसाय, मुख्य बाजारपेठा, मॉल्स, सर्व बंद होते. लॉकडाउन जाहीर केल्यानंतर नागरिकांनी देखील प्रशासनाला चांगला प्रतिसाद दिला होता. कंटेन्मेंट झोन करण्यात आले. करोना आळा बसेल यासाठी प्रत्येकासह कोरोना योद्ध्यांनी योगदान दिले. या सर्वांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे.


हेही वाचा – रुग्णवाहिका, बेडअभावी पत्रकाराचा मृत्यू; उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांचे चौकशीचे आदेश


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -