घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 53.51, तर देशात किती...

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 53.51, तर देशात किती टक्के मतदान?

Subscribe

देशात दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले असून हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशात सायंकाळी 7 वाजेपर्यंत 60.96 टक्के मतदान, तर राज्यातील 8 मतदारसंघांमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत अवघे 53.51 टक्के मतदान झाले.

मुंबई : अटीतटीच्या लढतींमुळे चर्चेत असलेल्या राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले. महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ -वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीसह देशातील 88 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसर्‍या टप्प्यातही मतदारांमध्ये कमालीचा निरुत्साह दिसून आला आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशात सायंकाळी 7 वाजेपर्यंत 60.96 टक्के मतदान, तर राज्यातील 8 मतदारसंघांमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत अवघे 53.51 टक्के मतदान झाले. (Lok Sabha Election 2024 second phase voting in Maharashtra details in Marathi)

देशात दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 7 वाजेपर्यंत 60.96 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच त्रिपुरात 77.97, तर मणिपूरमध्ये 77.18 टक्के मतदान झाले आहे. यानंतर केरळमध्ये 65.04 टक्के, छत्तीसगडमध्ये 72.51 टक्के, आसाम 70.68 टक्के, बिहार 54.17 टक्के, जम्मू आणि कश्मीर 67.22 टक्के, कर्नाटक 64.57 टक्के, मध्य प्रदेश 55.32 टक्के, महाराष्ट्र 53.51 टक्के, मणिपूर 77.18 टक्के, राजस्थान 60.06 टक्के, उत्तर प्रदेश 53.17 टक्के आणि पश्चिम बंगाल 71.84 टक्के मतदान झालं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : ऐन निवडणुकीत ठाण्यात सापडले ईव्हीएम अन् हजारो मतदान कार्ड, आव्हाडांकडून संताप

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील 8 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.51 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये वर्धा 56.66 टक्के, अकोला 52.49 टक्के, अमरावती 54.50  टक्के, बुलढाणा 52.24 टक्के, हिंगोली 52.03 टक्के, नांदेड 52.47 टक्के, परभणी 53.79 टक्के, यवतमाळ-वाशिम 54.04 टक्के एवढे मतदान झाले आहे. तर राज्यात पहिल्या टप्प्यात 6 मतदारसंघात 60.22 टक्के झाले होते. रामटेक – 58.50 टक्के, नागपूर 53.71 टक्के, भंडारा-गोंदिया 64.08 टक्के, गडचिरोली- चिमूर 67.17 टक्के, चंद्रपूर 60.03 टक्के मतदान झाले होते.

- Advertisement -

लोकसभेच्या 102 मतदासंघांसाठी झालेल्या पहिल्या टप्प्यात अवघे 62.37 टक्के इतके मतदान झाले होते, तर महाराष्ट्रातील 5 जागांसाठी अवघे 60.22 टक्के इतके कमी मतदान झाले होते. उष्णतेच्या लाटेमुळे पहिल्या टप्प्यात कमी मतदान झाल्याचा अंदाज वर्तवला गेला. कमी टक्केवारीचा धसका राजकीय नेत्यांसह निवडणूक आयोगानेही घेतला होता. त्यानुसार मतदारांना मतदानावेळी उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी मतदारांच्या सोयीसाठी सर्व मतदान केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. उकाड्याला तोंड देण्याच्या दृष्टीनेही सुविधा पुरवण्यात आल्या होत्या, परंतु या उपाययोजना करूनही मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले नाहीत.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : कुऱ्हाडीने EVM फोडल्याप्रकरणी तरुणाला अटक; नांदेडमधील धक्कादायक प्रकार

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -