घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रश्रीलंकेतील २३०० वर्षे जुना बोधीवृक्षाची बुद्ध स्मारकात होणार प्रतिष्ठापना

श्रीलंकेतील २३०० वर्षे जुना बोधीवृक्षाची बुद्ध स्मारकात होणार प्रतिष्ठापना

Subscribe

नाशिक : संपूर्ण विश्वाला शांती व अहिंसेचा संदेश देणार्‍या भगवान गौतम बुद्धांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, त्याच २३०० वर्षे जुन्या बोधीवृक्षाची श्रीलंकेतील अनुराधापुर येथील फांदीचा नाशकातील बुद्ध स्मारकात २३ व २४ मे रोजी प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या ऐतहासिक सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री दादा भुसे, श्रीलंकेचे बुद्धशासना व संस्कृती मंत्री विदुर विक्रमनायेके यांची विशेष उपस्थिती
असणार आहे.

२३०० वर्षांपूर्वी सम्राट अशोकचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांच्या माध्यमातून बुद्धगया येथून श्रीलंकेला अनुराधापुर या ठिकाणी बोधी वृक्षाची रुजूवात करण्यात आली. याच वृक्षाची फांदी नाशिकला मिळवण्यासाठी नाशकातील शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टने त्यासाठी पुढाकार घेतला. श्रीलंकन सरकारशी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या वृक्षाची फांदी देण्यासाठी तेथील सरकारने तयारी दाखवली. त्यानुसार २३ मे रोजी विमानातून मुंबईला बोधी वृक्षाची फांदी येणार असून, त्यानंतर २३ व २४ मे या दोन दिवसांत ऐतहासिक सोहळ्यात या फांदीचे रोपण केले जाणार आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी शासकीय मदत मिळणे आवश्यक असल्यामुळे शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टने आमदार ढिकले यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करत बुद्ध स्मारकात आवश्यक सुविधा पुरवण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे या सोहळ्याच्या सर्व नियोजनाची जबाबदारी दिली.

- Advertisement -

त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन यांनी आमदार ढिकले, ट्रस्टचे पदाधिकारी तसेच महापालिका व पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधून प्रत्यक्ष बुद्ध स्मारकातील नियोजित जागेची पाहणी केली. प्रामुख्याने बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण केल्यानंतर संबधित जागेला तारेचे कुंपण घालणे, पोलीस बंदोबस्त देणे, पूजा करणार्‍या बौद्ध भिक्खूंच्या निवासाची व्यवस्था करणे तसेच या वर्षभरात या ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांसाठी होणार्‍या खर्चासाठी शासकीय निधीची तरतुद करणे इ. मागण्या करण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मुख्य संयोजक भिक्खु सुगत थेरो, मुख्य निमंत्रक भिक्खु संघरत्न, भंते धम्मरक्षित मनपाचे मिळकत व्यवस्थापक राऊत, बुद्ध स्मारकाचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाने, निवृत्त सहकार विभागीय निबंधक गौतम भालेराव, देवेंद्र काळे, दिलीप साळवे, शरद काळे, बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

शांती, अहिंसेचा मार्ग सर्वांसाठीच प्रेरणादायक भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचा संदेश दिला होता. श्रीलंकेतील बोधी वृक्षाच्या फांदीचा नाशकातील रोपण सोहळा ऐतिहासिक असून या सोहळ्याला मी लहानसा हातभार लावला आहे. नाशिकच्या तिर्थभूमीच्या लैकिकात यानिमित्ताने मोठी भर पडणार आहे. : अ‍ॅड राहुल ढिकले, आमदार, भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -