घरक्राइमघरच्यांशी झालं भांडण, रागाच्या भरात त्याने मुंबईत बॉम्ब असल्याची अफवा पसरवली; पोलिसांनी...

घरच्यांशी झालं भांडण, रागाच्या भरात त्याने मुंबईत बॉम्ब असल्याची अफवा पसरवली; पोलिसांनी असा लावला छडा

Subscribe

पोलिसांना तपासाअंती काहीच सापडलं नसल्याने पोलिसांनी कॉलधारकालाच अटक केली आहे. दिनेश सुतार (२४) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बॉम्ब ठेवल्याचे अनेक निनावी कॉल मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत. मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, आणि निनावी कॉल समजून कोणीही बेफिकीर राहू नये याकरता प्रत्येक कॉलची खातरजमा केली जातेय. असाच एक प्रकार सोमवारी मुंबईत घडला आहे. झवेरी बाजारमध्ये बॉम्ब ठेवला असून या बॉम्बस्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असल्याचा एक निनावी कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला. मात्र पोलिसांना तपासाअंती काहीच सापडलं नसल्याने पोलिसांनी कॉलधारकालाच अटक केली आहे. दिनेश सुतार (२४) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

हेही वाचा – आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, त्यानंतर ‘डुप्लिकेट’वर पुणे पोलिसांत गुन्हा; वाचा काय आहे प्रकरण?

- Advertisement -

सोमवारी पोलीस नियंत्रण कक्षात एक फोन आला. साहेब झवेरी बाजारातील खाऊ गल्ली परिसरात बॉम्ब ठेवण्यात आला असून मोठा घातपात होणार आहे. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होणार आहे, अशी धमकी वजा इशारा देण्यात आला होता. या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी तत्काळ तपासकार्य सुरू केलं. सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. लोकामान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक घटनास्थली पोहोचले. त्यांनी संपूर्ण खाऊ गल्लीचा परिसर रिकामा केला. बॉम्बशोधक पथकाने या परिसराची सखोल तपासणी केली. परंतु, बॉम्ब किंवा बॉम्बसदृश काहीच आढळलं नाही. ज्या नंबरहून फोन आला होता, त्या क्रमाकांवर पुन्हा पोलिसांनी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित तरुणाने फोन कट केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करून त्याला भुलेश्वर येथून अटक केली. दिनेश सुतार असं या अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

हेही वाचा – मानखुर्दमध्ये ९ लाख १६ हजारांच्या बोगस नोटांसह इतर साहित्य हस्तगत

- Advertisement -

हा तरुण मुळचा सोलापूरचा असून नोकरीनिमित्त तो मुंबई असतो. मात्र, सध्या तो बेरोजगार आहे. गावी घरच्यांशी भांडण झालं म्हणून तो पुन्हा मुंबईत आला. काळबादेवी येथील शकुंतला इमारतीजवळील एका दुकानाबाहेर तो राहतो. घरच्यांशी भांडण झालं म्हणून त्याने पोलिसांना फोन करून अफा उठवली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -