घरमहाराष्ट्रमहापौरांच्या फिर्यादीनंतर आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महापौरांच्या फिर्यादीनंतर आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Subscribe

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार अडचणीत सापडले आहेत. किशोरी पेडणेकर यांच्या फिर्यादीनंतर ॲड. आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत महापौरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलं होतं.

ॲड. आशिष शेलार यांनी वरळीमध्ये झालेल्या सिलिंडर स्फोट प्रकरणी ४ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ‘सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होता’ असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावरुन किशोरी पेडणेकर यांनी ॲड. आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवत गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

किशोरी पेडणेकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लिहिलेल्या पत्रात मुंबईचे महापौर प्रथम नागरिक असून ते अत्यंत महत्त्वाचे पद आहे. महिला महापौर असताना माझ्याबाबत उदगारलेले शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्त्याचा मी निषेध व्यक्त करीत असून त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे त्यामुळे माझा आणि समस्त स्त्री जातीचा अवमान केला असल्याचं म्हणत ॲड. आशिष शेलार यांच्या विरोधात पोलीसात तक्रार नोंदवणार असल्याचं सांगितलं होतं.

महिला आयोगाकडून दखल

आशीष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. जबाबदार लोकप्रतिनिधींनी महिलांच्या संदर्भात केलेली कोणतीही अवमानकारक वक्तव्ये अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत, असे आयोगाने बजावले आहे. यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाला सादर करावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – आशिष शेलार यांचं महापौरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; किशोरी पेडणेकर यांचं गृहमंत्र्यांना पत्र

आशीष शेलारांच्या महापौरांविषयी केलेल्या विधानाची महिला आयोगाकडून दखल


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -