घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआश्रमशाळेच्या नावाखाली वेगळाच प्रकार?; अल्पवयीन मुलींना हॉटेलात नाचवले जात असल्याचा प्रकार उघड

आश्रमशाळेच्या नावाखाली वेगळाच प्रकार?; अल्पवयीन मुलींना हॉटेलात नाचवले जात असल्याचा प्रकार उघड

Subscribe
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी पंचक्रोशीतील सामुंडी येथील सर्वहरा परिवर्तन केंद्र या आश्रमशाळेत ठिकाणी शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनींना पर्यटकांच्या समोर बळजबरीने नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजू उर्फ वादीराज भीमराज नाईक (रा. राणेनगर, नाशिक) आणि शिक्षिका माधुरी गवळी यांच्या विरोधात मुलींच्या पालकांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षिका माधुरी गवळी मुलींना छडीने मारहाण करून दमदाटी व जबरदस्तीने पर्यटकांसमोर नाचण्यास भाग पाडत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.या धक्कादायक प्रकारामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून जिल्हयाभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा संपूर्ण तपास नाशिक ग्रामीणचे उपअधिक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील व हवालदार खांदवे करीत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, पहिने येथे एका खासगी संस्थेची काही वर्षांपासून कायमस्वरूपी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या वर्षा पासुन मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. शाळा सुरू होण्यासाठी पंधरा दिवस बाकी असतानाच वसतिगृहात सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना ३१ मे २०२३ पासूनच प्रवेश देण्यात आला. सुटीत मुलींना पारंपरिक नृत्य व संगणक शिक्षण दिले जाणार असल्याचे संस्थेने सांगितले होते. मात्र  प्रत्यक्षात मुलींना संगणक शिक्षण दिले नसल्याचा आरोप मुलींनी केला. संस्थेची सहावी पर्यंतच शाळा असल्याने या मुलींना त्र्यंबकेश्वर येथील शाळेत शिक्षणासाठी पाठविले जाते. पालकांनी मुलींसाठी प्रत्येकी ३,५०० रुपये अनामत रक्कम जमा केली. या संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर हॉटेल असून, तेथे मे महिन्याच्या सुट्टीत येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात.
या पर्यटकांसमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलींना नाचण्यास सांगितले जाते. नाचले नाही तर शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली होती. वसतिगृहाच्या शिक्षिका मुलींना पारंपरिक नृत्य शिकवत असताना पर्यटक ते पाहत असतील. आम्ही मुलींना कोणत्याही प्रकारे इतरांसमोर नाचण्यास सांगितलेले नाही असा दावा एका शिक्षकाने केला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -