घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रफ्लॅटची मालकीण असल्याचा बनाव करत काढले तब्बल ६ कोटींचे कर्ज, आणि...

फ्लॅटची मालकीण असल्याचा बनाव करत काढले तब्बल ६ कोटींचे कर्ज, आणि…

Subscribe

नाशिक : फ्लॅटचे बोगस मुखत्यारपत्र बनवत तीन जणांनी फ्लॅट खरेदी-विक्री करण्याचे सर्व अधिकार घेत फ्लॅटवर मुंबईमधील एका बँकेत फ्लॅट तारण ठेवत त्यावर ६ कोटींचे कर्ज काढून भोपाळ येथील महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील पती-पत्नीसह एकाविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि बबली सिंग (रा. आनंदवली, नाशिक, सध्या रा. भोपाळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सिंग यांनी 2002 मध्ये बांधकाम व्यावसायिासोबत करारनामा केला होता. फ्लॅट घेतल्यानंतर त्या भोपाळला गेल्या. या कालावधीत त्यांनी कुठलेही व्यवहार केला नव्हता. ही बाब बबली सिंग यांच्या ओळखाचा संशयित आनंदकुमार सिंग (रा. लखनऊ) यास समजली. त्याने पत्नी प्रिती सिंग आणि संजय प्रभाकर (भडके रा. चव्हाटा, भद्रकाली) यांच्या मदतीने बबली सिंग यांच्या नावाचे बोगस जनरल मुखत्यारपत्र तयार केले. या दस्तावेजामध्ये बबली सिंग यांच्याकडून सर्व अधिकार घेतल्याचे भासवत फ्लॅटचे सेलडीड कागदपत्र बनवले.

- Advertisement -

फ्लॅट बबली सिंग यांच्या नावे असल्याने त्यांच्या जागेवर संशयिताने त्याची पत्नी प्रिती सिंगला उभे करत या बोगस कागदपत्राच्या अधारे बांद्रा मुंबई येथील आयडीबीआय बँकेत फ्लॅट तारण ठेवत त्यावर 6 कोटींचे कर्ज काढले. बबली सिंग यांना 2012 मध्ये फ्लॅटवर कर्ज असल्याने बँकेकडून नोटीस आली. फ्लॅटवर कुठल्याही स्वरुपाचे कर्ज काढलेले नसताना नोटीस आल्याने त्यांनी बँकेकडून कागदपत्रांची मागणी केली. दस्तावेज पाहिले असता त्यावर बबली सिंग यांच्याजागेवर प्रिती सिंग ही महिला उभी असल्याचे समजले. त्यातून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संशयित आनंदकुमार सिंग याच्या विरोधात उत्तर प्रदेशात आर्थिक अपहाराचे गुन्हे दाखल आहेत. सीबीआय मध्ये त्याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याने सीबीआयने त्याला दोन वर्षापुर्वी अटक केली आहे. तेव्हापासून तो लखनऊ कारागृहात आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवी मगर तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -