घरताज्या घडामोडीLockdown: बांधकाम मजुरांना मिळाला 'आश्रय'

Lockdown: बांधकाम मजुरांना मिळाला ‘आश्रय’

Subscribe

400 कामगारांच्या जेवणाची केली व्यवस्था

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. श्रमिक, बेघरांचे होणारे हाल पाहून प्रतीक्षा नगरमधील आश्रय फाउंडेशनने मदतीचा हात पुढे करत त्यांना ‘आश्रय’ दिला आहे. आश्रय या सामाजिक संघटनेने ४०० बांधकाम कामगारांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देत कामगारांना मोठा दिलासा दिला आहे.

प्रतीक्षा नगर सायन कोळीवाडा येथील आश्रय फाउंडेशनने नेहमीच सामाजिक कार्यात भरीव कामगिरी केली आहे. आरोग्य शिबीर, शैक्षणिक मदत, पावसात अडकलेल्या नागरिकांना मदत, पोलीसांची आरोग्य तपासणी आदी स्वरूपात नेहमीच पुढाकार घेतला आहे. प्रतिक्षा नगर मधील म्हाडा संक्रमण शिबिराच्या इमारतीचे काम सुरू आहे. या बांधकाम कामगारांना लॉकडाऊनच्या काळात रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच प्रतिक्षा नगरमधील अजूबाजूच्या झोपडपट्टीतील गरजू नागरिक, हाउसिंग सोसायटी साफ करणारे सफाई कामगार अशा ४०० लोकांची लॉकडाऊनच्या काळात सकाळी ११ ते २ आणि सयंकाळी ७ ते १० या वेळेत जेवणाची सोय फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रॅपीड टेस्ट किटमध्ये उणिवा; दोन दिवस चाचणी किट वापरू नका – ICMR


पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन मध्ये आम्ही गरिबांची सेवा केली आहे. आता पुढील लॉकडाउनच्या काळातही अन्नछत्र चालू ठेवून भुकेल्या व्यक्तींची भूक भागवणार असल्याची माहिती आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन क्षीरसागर यांनी दिली. फाउंडेशनचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि दानशूर व्यक्तींची या कामी फार मोठी मदत झाल्याचं ते म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -