घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री खुर्चीवर नसतानाही राज्य चांगले पद्धतीने चाललंय याचं श्रेय..., रावसाहेब दानवेंची ठाकरे...

मुख्यमंत्री खुर्चीवर नसतानाही राज्य चांगले पद्धतीने चाललंय याचं श्रेय…, रावसाहेब दानवेंची ठाकरे सरकारवर टीका

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्यामुळे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभा, कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजेरी लावत नाही आहेत. व्हिसीद्वारे मुख्यमंत्री बैठकांना उपस्थिती लावत आहेत. मुख्यमंत्री अनेक बैठका या शाससकीय निवासस्थानाहूनच ऑनलाईन बैठका घेत आहेत. मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री कामकाज पाहत नाहीत यामुळे त्यांच्यावर टीका कऱण्यात येत आहे. भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य चांगले चालले आहे. अशी खोचक टीका केली आहे. तसेच याचे सर्व श्रेय राज्यपाल आणि जनतेला दानवेंनी दिले आहे.

भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे महाविकास आघाडीवर टीका करत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरुनच काम करत असल्यामुळे भाजपकडून प्रचंड टीका करण्यात येते. केंद्रीय मंत्री दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री नसताना राज्य उत्तम चाललं असल्याची टीका केली आहे. दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री खुर्चीवर नाही आहेत तरिही राज्य व्यवस्थित चालले आहे. खर तर आताच राज्य व्यवस्थित चालले आहे. याचे कारण म्हणजे राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना जर राज्य चांगल्या पद्धतीने चालले असेल तर याचे सर्व श्रेय या राज्यातील शांतता संयमी आणि सहनशील जनतेच असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.

- Advertisement -

दानवे- सत्तारांची दिल्लीत गळाभेट

भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा पूल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बांधू शकतात असे वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. यानंतर बुधवारी सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीत गळाभेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय नेत्यांमध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा : महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य भोवलं; कालीचरण महाराजाला पुणे पोलिसांकडून अटक

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -