घरमहाराष्ट्रअब्दुल सत्तारांच्या निवासस्थानी तोडफोड; 18 जणांविरुद्ध गुन्हा

अब्दुल सत्तारांच्या निवासस्थानी तोडफोड; 18 जणांविरुद्ध गुन्हा

Subscribe

कफ परेड पोलिसांनी आंदोलनासह घोषणाबाजी आणि खिडकीचे नुकसान करणार्‍या 18 जणांविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सुप्रिया सुळे यांच्याविषयी अब्दुल सत्तार यांनी अत्यंत घाणेरड्या आणि आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केले होते

मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पक्षातील अनेक नेते प्रचंड आक्रमक झाले होते. त्यातच एक भाग म्हणून संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या कफ परेड येथील निवासस्थानी जोरदार आंदोलन करुन घोषणाबाजी केली. यावेळी काही संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या खिडकीची तोडफोड केली होती.

याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी आंदोलनासह घोषणाबाजी आणि खिडकीचे नुकसान करणार्‍या 18 जणांविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सुप्रिया सुळे यांच्याविषयी अब्दुल सत्तार यांनी अत्यंत घाणेरड्या आणि आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले होते. या विधानाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या कफ परेड येथील निवासस्थानासमोर मोर्चा काढला होता. यावेळी या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलन केले.

- Advertisement -

काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करून खिडकीच्या काचा फोडून आपला संताप व्यक्त केला होता. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित कार्यकर्ते आक्रमक होत असल्याने पोलिसांनी या कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी विद्या चव्हाण, नरेंद्र मुरारी यांच्यासह कफ परेड पोलीस ठाण्यात भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यांपैकी 14 जणांना पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या कार्यकर्त्यांविरुद्ध जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचाः राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला नांदेडमधून सुरुवात; जाणून घ्या यात्रेतील घडामोडी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -